आपला जिल्हा

पढेगावात रात्री उशिरा बिबट्या वनविभागाच्या जाळ्यात

पढेगावात रात्री उशिरा बिबट्या वनविभागाच्या जाळ्यात

पढेगावात रात्री उशिरा बिबट्या वनविभागाच्या जाळ्यात

जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि १६ डिसेंबर २०२५अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव वनपरिक्षेत्रातील व कोपरगाव तालुक्यातील पढेगावात धुमाकूळ घालणारा बिबट्या कोपरगाव वनविभागाच्या पिंजऱ्यात सोमवारी रात्री उशिरा जेरबंद झाल्याने नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला आहे.

जाहिरात

सविस्तर वृत्त असे की, कोपरगाव तालुक्यात अनेक ठिकाणी बिबट्याचा वावर असल्याने, शेती करणे अवघड झाले असतांना पढेगाव शिवारात बिबटया चा वावर मोठ्या प्रमाणात आढळल्याने परिसरात भीती निर्माण झाली होती. म्हणूनच खबरदारीचा उपाय म्हणून गावचे  सरपंच व ग्रामस्थ  यांच्या मागणी नुसार अण्णासाहेब कारभारी शिंदे   यांच्या शेतात वनविभागाने पिंजरा लावला होता.

जाहिरात

याच पिंजऱ्यात सोमवार दि १५ डिसेंबर  रोजी सांयकाळी ७ च्या सुमारास बिबटया पिंजऱ्यात कैद झाला याची माहिती ग्रामस्थांनी तात्काळ वनविभागाला दिली असता तत्काळ वन कर्मचारी घटनास्थळी दाखल होत पुढील कारवाई केली तर याप्रसंगी बिबट्याला बघण्यासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.

सदर कार्यवाही उपवनसंरक्षक अहिल्यानगर  धर्मवीर सालविठ्ठल ,सहा वनसंरक्षक जि पी मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी कोपरगाव निलेश रोडे यांच्या निर्देशानुसार वनपाल भगवान जाधव, वनरक्षक अमोल किंकर , वनरक्षक  श्रध्दा पडवळ , वनरक्षक  निकीता पगारे, वनपाल सानप, अक्षय बडे, राहूल कानडे, विलास डगळे यांनी केली.

सदर बिबट्या सुमारे ४ ते ५ वर्षांचा आहे. सदर बिबट्याला डिग्रस रोपवाटिका राहुरी येथे हलविण्यात आले आहे

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे