आपला जिल्हा

प्रभाग क्रमांक ५ मध्ये चैताली काळेंच्या प्रचार सभेला उस्फुर्त प्रतिसाद

प्रभाग क्रमांक ५ मध्ये चैताली काळेंच्या प्रचार सभेला उस्फुर्त प्रतिसाद

नगराध्यक्ष पदाचे उमेदवार काका कोयटे व प्रभाग ५ मधील उमेदवार शोभा घायतडकर व अमित आगलावे यांना भरघोस मताने निवडुन देण्याचे अवाहन

जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि १६ डिसेंबर २०२५ :- कोपरगावच्या लाडक्या बहिणींनी २०१९ आणि २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत आ.आशुतोष काळे यांना भरभरून मतांनी निवडून दिले.त्यातून उतराई होण्यासाठी कोपरगाव मतदार संघाबरोबरच कोपरगाव शहरदेखील इतर विकसित शहरांच्या बरोबरीने घेवून जायचे आहे. त्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या ताब्यात कोपरगाव नगरपरिषदेची सत्ता द्या.  आपल्या प्रभागाचा आणि आपल्या कोपरगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे यांना आ. आशुतोष काळे यांनी नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिलेली आहे. काकासाहेब कोयटे सामाजिक कामात व नेहमीच कोपरगावकरांच्या सुख- दुःखात सहभाग घेतात अशा सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या काकांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांना निवडून देणे ही कोपरगाव शहराच्या विकासाची गरज आहे.  त्यामुळे कोपरगाव नगरपरिषदेची सत्ता राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला द्या तुमच्या विकासाच्या सर्व अपेक्षा पूर्ण होतील असा विश्वास जिल्हा बँकेच्या मा. संचालिका  चैतालीताई काळे यांनी कोपरगाव शहरातील प्र.क्र.०५ मधील कॉर्नर सभेत नागरीकांशी संवाद साधतांना व्यक्त केला यावेळी या कॉर्नर सभेला महिला भगिनींनी मोठी गर्दी केली होती.

जाहिरात

यावेळी चैतालीताई काळे म्हणाल्या की, कोपरगावच्या नागरीकांना हवा असलेला विकास आ.आशुतोष काळे यांनी करून दाखवला हे कोपरगावकरांनी पाहीले आहे आणि नगरपालिकेची सत्ता नसल्यामुळे सर्वांगीण विकास करण्यासाठी येणाऱ्या अडचणीपण कोपरगावकरांनी पाहील्या आहेत.कोपरगाव शहराच्या विकासाच्या अनेक संकल्पना आ.आशुतोष काळे यांच्याकडे आहेत आणि या विकासाच्या संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून काकासाहेब कोयटे यांच्या रूपाने सक्षम, अभ्यासू आणि समाजाच्या सोबत असणारे नेतृत्व दिले आहेत.

जाहिरात

काका कोयटे यांनी महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी समता उद्योग मंदिर उभारून ठोस कृती केली आहे. या समता उद्योग मंदिराच्या माध्यमातून शेकडो महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. महिलांना अगरबत्तीमेणबत्तीकापूरदिव्यांच्या वाती अशा नागरीकांना लागणाऱ्या दैनंदिन वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण देवून महिलांना घरबसल्या रोजगार उपलब्ध करून दिले आहे असे आजवर केलेले अनेक सामाजिक उपक्रम कोपरगावकर पाहत आहेत अनुभवत आहेत. 

 महिलांना विकासाच्या केंद्रस्थानी ठेवणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. महिलांसाठी उद्योगस्वयंरोजगार आणि स्वावलंबनाची संधी उपलब्ध करून देण्याची खरी ताकद आ.आशुतोष काळे यांच्याकडे आहे. कोपरगाव शहर आ.आशुतोष काळे यांच्या विकास दृष्टीतून समृद्ध होत आहे. कोपरगावच्या प्रत्येक घरात २३ दिवसांनी येणारे पाणी ४ दिवसांनी येत असून ते नियमित देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. चांगले रस्तेस्वच्छ व सुंदर शहरसक्षम आरोग्य सुविधा आणि सुरक्षित भविष्य देण्यासाठी कोपरगाव नगर परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला बाहुमतासह सत्ता द्या असे आवाहन सौ.चैतालीताई काळे यांनी यावेळी केले.

 कोपरगावच्या  लाडक्या बहिणींना स्वच्छ पाणीस्वच्छ परीसरा बरोबरच आरोग्याच्या सुख सुविधा नगरपालिकेच्या माध्यमातून पुरवून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आ.आशुतोष काळे यांच्या सहकार्यातून उद्योग मंदिर उभारून त्यांच्या हाताला रोजगार उपलब्ध करून द्यायचा आहे. महिला नेहमीच कुटुंबाला योग्य दिशा देण्याचे काम करतात. महिला ज्या पद्धतीने आर्थिक बचत करून घर सांभाळतात त्या महिला स्वतःचा उद्योग व्यवसायपण समर्थपणे सांभाळू शकतात याचा मला विश्वास आहे. त्यामुळे कोपरगाव नगरपरिषदेच्या माध्यमातून कोपरगाव शहरातील महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्याचा आमचा निर्धार आहे.

काकासाहेब कोयटे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे