विवेकभैय्या कोल्हे बुद्धिबळ स्पर्धेत धारणगावकर भगिनींचे मोठे यश
विवेकभैय्या कोल्हे बुद्धिबळ स्पर्धेत धारणगावकर भगिनींचे मोठे यश
विवेकभैय्या कोल्हे बुद्धिबळ स्पर्धेत धारणगावकर भगिनींचे मोठे यश

कोपरगाव विजय कापसे दि ५ ऑगस्ट २०२५– ग्रामीण भागातील खेळाडूंना मोकळे व्यासपीठ मिळावे या उद्देशाने नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या संजीवनी युवा प्रतिष्ठान व कोपरगाव चेस स्पोर्ट्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमानाने पार पडलेल्या विवेकभैय्या कोल्हे खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत कोपरगावचे प्रज्ञा व विशाल धारणगावकर यांच्या तिन्ही मुलींनी मोठे यश संपादन करत नावलौकिक मिळवले आहे.

सविस्तर वृत्त असे की, शनिवार दिनांक २ ऑगस्ट २०२५ व रविवार दिनांक ३ ऑगस्ट २०२५ या कालावधीत श्री संत जनार्दन स्वामी भक्तनिवास कोपरगाव येथे अहिल्यानगर डिस्ट्रिक्ट सर्कल यांच्या मान्यतेने युवा नेते भैयाकोल्हे खुल्या राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत १४ वर्षे वयोगटात आर्या विशाल धारणगावकर हिने द्वितीय क्रमांक तर श्रेया विशाल धारणगावकर हिने वय वर्ष ११ खालील वयोगटात प्रथम क्रमांक व नव्या विशाल धारणगावकर हिने सहभाग नोंदवत विशेष यश मिळवत गौरव संपन्न केला आहे.





