आपला जिल्हा

डॉ.सी.एम मेहता कन्या विद्यालयात विद्यार्थिनींना मार्गदर्शन व्याख्यानमाला शिबिर संपन्न

डॉ.सी.एम मेहता कन्या विद्यालयात विद्यार्थिनींना मार्गदर्शन व्याख्यानमाला शिबिर संपन्न
डॉ.सी.एम मेहता कन्या विद्यालयात विद्यार्थिनींना मार्गदर्शन व्याख्यानमाला शिबिर संपन्न
जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि १७ डिसेंबर २०२५आशिया खंडातील सर्वात मोठ्या रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा देशाचे माजी कृषिमंत्री खासदार शरदचंद्र पवार यांच्या ८५ वा वाढदिवस रयत संकुलात वेगवेगळ्या उपक्रमांनी साजरा केला जात असून त्याच अनुषंगाने रयत शिक्षण संस्थेचे कोपरगाव येथील डॉ.सी.एम मेहता कन्या विद्यालयात आयोजित व्याख्यानमाला शिबिरात

मुख्याध्यापिका अनिता धनक यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार दि १७ डिसेंबर रोजी राज्यात एस सी मुलींच्या रँकिंगमध्ये १४ रँकिंगने एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण उषा पवार, हेल्थ कोच तथा समृद्धी शहर स्तर व्यवस्थापक हर्षा पाटील यांनी विद्यार्थिनींना मोलाचे मार्गदर्शन केले.

जाहिरात
 याप्रसंगी विद्यालयाच्या उपमुख्याध्यापिका उज्वला म्हस्के, पर्यवेक्षक प्रभाकर आभाळे, पर्यवेक्षिका सुनीता पवार, ज्येष्ठ शिक्षिका निकम मॅडम आदीसह शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व मोठ्या संख्येने विद्यार्थीनी उपस्थित होत्या.

जाहिरात
या प्रसंगी हेल्थ कोच हर्षा पाटील यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना निरोगी व सदृढ शरीरासाठी आवश्यकतेनुसार सकस पुरेसा आहार घेणे किती आवश्यक आहे यावर वेगळे उदाहरण देत भाजीपाला, फळे, डाळी आदी सकस आहाराचे महत्व पटवून सांगत अभ्यासात एकाग्रता वाढीसाठी दररोज नित्य नियमाने प्रत्येकाने पुरेसा व्यायाम, योगा, प्राणायाम,पुरेशी झोप घेणे देखील खूप महत्त्वाचे असल्याचे सांगत त्यासोबतच प्रत्येकाने मैदानी खेळावर जास्तीत जास्त भर द्यावे ज्यामुळे आपले शरीर निरोगी राहत असे सांगितले.
 तर  एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण उषा पवार हिने आजची महिला ही कोणत्याच क्षेत्रात मागे नाहीये त्यामुळे आपण देखील न डगमगता आयुष्यात आपल्याला काय व्हायचे हे ध्येय उराशी बाळगत मार्गक्रमण करत यशाच्या दिशेने वाटचाल करायला हवी असल्याचे सांगत अभ्यासाला व कष्टाला कोणत्याही कारणांची गरज नसते यासाठी फक्त मनाशी जिद्द व कष्ट आणि ध्येय महत्त्वाचे असते त्यामुळे आपल्याला हे नाही ते नाही ही कारणे न देता आलेल्या परिस्थितीत अत्यंत चिकाटीने जिद्दीने अभ्यास करत आपल्याला हवं ते ध्येय गाठण्यासाठी मनापासून प्रयत्न करायला हवे असल्याचे सांगत प्रत्येकाने अभ्यासा सोबतच थोर महापुरुषांच्या जीवन चरित्राचा अभ्यास करत त्यांचे विचार अंगीकृत करण्याचा मौखिक सल्ला पवार यांनी विद्यार्थिनींना देत जीवनात मोठे व्हायचे असेल तर मेहनत आवश्यक असल्याचे सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाचे ललित जगताप यांनी तर उपस्थितांचे आभार उमेश बोढरे यांनी व्यक्त केले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे