संजीवनी शैक्षणिक संस्था
अमृतवाहिनी एमबीएच्या ओंकार शिंदे यांची २० लाखाच्या पॅकेजवर नायजेरियन नोकरीसाठी निवड
अमृतवाहिनी एमबीएच्या ओंकार शिंदे यांची २० लाखाच्या पॅकेजवर नायजेरियन नोकरीसाठी निवड

संगमनेर प्रतिनिधी दि १७ मे २०२४– मा.शिक्षण मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली गुणवत्तेमुळे संपूर्ण देशात अग्रगण्य ठरलेल्या अमृतवाहिनी एमबीए मधील अनेक विद्यार्थी विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये चांगल्या पदावर कार्यरत असून नुकतेच ओकार विलास शिंदे या विद्यार्थ्यांची नायजेरिया येथे वीस लाखाच्या पॅकेजवर निवड झाली असल्याची माहिती संचालक डॉ.बी एम लोंढे यांनी दिली आहे.


