आपला जिल्हा

काका कोयटे अपयशी होणार, इतिहास घडणार

काका कोयटे अपयशी होणार, इतिहास घडणार

काका कोयटे अपयशी होणार, इतिहास घडणार

जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि १८ डिसेंबर २०२५कोपरगाव नगरपरिषद निवडणुकीत 75 ओलांडून गेल्यानंतर नगराध्यक्ष पदाची डोहाळे लागलेले काका कोयटे यांच्या नशिबात कधीही ते पद नाही. उभ्या आयुष्यात यशस्वी झाला नाही असा अपयशी राजकारणी म्हणून त्यांचा प्रवास राहिला आहे. स्वतः विजय होऊ शकत नाही याचा अनुभव त्यांना आल्यानंतर हास्य जत्रेसारखे स्वतःवर हसून घेण्याचे कार्यक्रम त्यांना करावे लागत आहेत.

जाहिरात

कम नशिबी राजकारणी म्हणून त्यांच्यावर कायमचा शिक्का बसलेला आहे आणि काळे गटाने देखील आपल्या एखाद्या निष्ठावंताचा बळी जाण्यापेक्षा बाहेरील बळीचा ब*रा शोधून त्यांना पराभवाच्या तोंडी उभे केले आहे अशी जोरदार चर्चा नागरिकांमध्ये रंगली आहे.

समता पतसंस्थेच्या अनेक वेगवेगळ्या प्रकरणांची चर्चा सुरू असताना तिला बगल देण्यासाठी आणि नागरिकांचे प्रश्न दुर्लक्षित करून बालिश हसण्याचे काम करणे हा अतिशय तीटकारा आणणारा प्रकार करावा लागण्याची दुर्दैवी वेळ अपयशाच्या भीतीने त्यांच्यावर आली आहे.

जाहिरात

येत्या 20 तारखेला काका कोयटे यांचा खात्रीशीर रित्या पराभव होत असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. मुळातच कशाला नसत्या भानगडीत पडायचे चांगलं चालू होतं हाताने दुखणे वाढवून घेतले आणि स्वतःचे लपवलेल्या चेहऱ्याचे पितळ उघडे पडले अशा प्रकारचे परखड शब्दात नागरिक अपरोक्ष चर्चा करू लागले आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे