आपला जिल्हा

श्री साईबाबा संस्थानला दुबई व मध्यप्रदेश येथील साईभक्ताचे सुवर्णदान

श्री साईबाबा संस्थानला दुबई व मध्यप्रदेश येथील साईभक्ताचे सुवर्णदान

श्री साईबाबा संस्थानला दुबई व मध्यप्रदेश येथील साईभक्ताचे सुवर्णदान

दुबई येथील साई भक्तांकडून सोन्याचा मुलामा असलेली सुंदर फ्रेम अर्पण 

शिर्डी विजय कापसे दि १८ डिसेंबर २०२५श्री साईबाबा संस्थानला देश-विदेशातील साईभक्त मोठ्या श्रद्धेने विविध प्रकारचे दान अर्पण करत असतात. आज दुबई येथील एका साईभक्ताने श्री साई मंदिराच्या उत्तर बाजूस असलेल्या खिडकीस चारही बाजूंनी आकर्षक नक्षीकाम व सोन्याचा मुलामा असलेली सुंदर फ्रेम अर्पण केली आहे.

जाहिरात

या खिडकीतून श्री साईबाबांच्या समाधी मंदिरातील मूर्तीचे दर्शन होत असल्याने दररोज मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी मुखदर्शनासाठी येतात. या ठिकाणी फ्रेमवर करण्यात आलेले सुवर्ण नक्षीकाम भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे.

जाहिरात

या कामाच्या प्रारंभी विधिवत पूजा करण्यात आली. त्यानंतर संबंधित साईभक्ताचा श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. साईभक्ताच्या विनंतीनुसार त्यांचे नाव गोपनीय ठेवण्यात आले आहे.

जाहिरात

मध्यप्रदेश येथील साई भक्तांकडून सुवर्ण मुकुट दान

देश-विदेशातील लाखो भाविकांची श्री साईबाबांवर अढळ श्रद्धा असून, भक्त मोठ्या भक्तिभावाने श्री साईबाबांच्या चरणी भरभरून दान अर्पण करत असतात.

आज दिनांक १८ डिसेंबर २०२५ रोजी मध्य प्रदेश राज्यातील हरदासपूर येथील साईभक्त श्री. तेज बहादुर सिंह यांनी श्री साईबाबांच्या चरणी २०० ग्रॅम वजनाचा आकर्षक व सुंदर नक्षीकाम असलेला सुवर्ण मुकुट भक्तिभावाने अर्पण केला. या कलात्मक सुवर्ण मुकुटाची किंमत अंदाजे  २० लाख १६ हजार इतकी किंमत आहे.

सदर सुवर्ण मुकुट श्री साईबाबांच्या चरणी अर्पण करून तो श्री साईबाबा संस्थानचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. भिमराज दराडे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. यानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. भिमराज दराडे यांनी दानशूर साईभक्त श्री. तेज बहादुर सिंह यांचा सत्कार करून त्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे