गोदा व्हॅली इंटरनॅशनल स्कूलची १००% टक्के निकालाची परंपरा कायम
गोदा व्हॅली इंटरनॅशनल स्कूलची १००% टक्के निकालाची परंपरा कायम
गोदा व्हॅली इंटरनॅशनल स्कूलची १००% टक्के निकालाची परंपरा कायम

कोपरगाव विजय कापसे दि २८ मे २०२४–महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या १० वीच्या परीक्षेचा अंतिम निकाल नुकताच मंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द झाला असून यात रवंदे येथील गोदा व्हॅली इंटरनॅशनल स्कूलचा १००% टक्के निकाल लागला आहे.

यात शौर्य संतोष थोरात ९५.४० टक्के मार्क मिळवत प्रथम क्रमांक मिळविला आहे. जानवी चंद्रशेखर कदम ९२.८० टक्के मार्क मिळवत द्वितीय क्रमांक, सार्थक ज्ञानदेव दवंगे याने ८९ टक्के मार्क मिळवत तृतीय क्रमांक, श्रद्धा प्रताप गुडघे ८७.२० टक्के मार्क मिळवत चतुर्थ क्रमांक तर प्रतीक प्रदीप लोणारी ८४.४० टक्के मार्क मिळवत पाचव्या स्थानावर यशस्वी झाला आहे.

या सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे ओम साई एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष चंद्रशेखर सखाराम कदम यांनी भरभरून कौतुक केले आणि आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थी कोणत्याही खाजगी शिकवणीला न जाता केवळ शाळेतील शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी घेतलेली ही उत्तुंग भरारी खरोखरच उल्लेखनीय आहे अशा शब्दात विद्यार्थी व शिक्षकांचे कौतुक आणि अभिनंदन केले.

तसेच ओम साई एज्युकेशन सोसायटीच्या खजिनदार दिपाली चंद्रशेखर कदम, सदस्या सुनंदाताई सखाराम कदम, मीनल भाऊसाहेब सोनवणे तसेच गोदा व्हॅली इंग्लिश मिडियम स्कूल आणि गोदा व्हॅली इंटरनॅशनल स्कूलच्या मुख्याध्यापिका अनिता कडलक तसेच शिक्षक मोनाली वाईकर, सचिन भागवत, प्रकाश गोरे, रोहित मालकर, शितल कोतकर आणि शैलेंद्र निरगुडे यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.




