संगमनेर
डॉ. स्वप्नील ताजने यांचा पीएचडी पदवीने गौरव
ढोलेवाडी गावच्या शिरपेचात मानाचा तुरा
ढोलेवाडी गावच्या शिरपेचात मानाचा तुरा

संगमनेर विजय कापसे दि ३ मार्च २०२५- संगमनेर तालुक्यातील ढोलेवाडी गावचे डॉ. स्वप्निल गुलाब ताजणे यांना भारती विद्यापीठ , पुणे यांच्या वतीने सर्जरी विभागातील पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली आहे

डॉ स्वप्नील ताजने यांच्या यशाबद्दल काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य लोकनेते बाळासाहेब थोरात ,माजी आमदार डॉ सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, डॉ.जयश्रीताई थोरात, इंद्रजीत भाऊ थोरात, कारखान्याचे चेअरमन बाबासाहेब ओहोळ, व्हाईस चेअरमन संतोष हासे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ देशपांडे, मेडिकल डायरेक्टर डॉ काटकर, कारखान्याचे सेक्रेटरी किरण कानवडे, यांनी अभिनंदन केले आहे


