आपला जिल्हा

अमृतवाहिनी बँकेला ग्रीन वर्ल्ड को प्राईड 2025 पुरस्कार प्रदान; उत्कृष्ट कामकाजाबद्दल गौरव

अमृतवाहिनी बँकेला ग्रीन वर्ल्ड को प्राईड 2025 पुरस्कार प्रदान; उत्कृष्ट कामकाजाबद्दल गौरव
अमृतवाहिनी बँकेला ग्रीन वर्ल्ड को प्राईड 2025 पुरस्कार प्रदान; उत्कृष्ट कामकाजाबद्दल गौरव
जाहिरात

संगमनेर विजय कापसे दि २६ डिसेंबर २०२५लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील शेतकरी, नागरिक,युवक यांच्या जीवनात आर्थिक समृद्धी निर्माण करताना तालुक्याची कामधेनू म्हणून काम करणाऱ्या सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँकेला उत्कृष्ट व आदर्शवत कामकाजाबद्दल 2025 चा ग्रीन वर्ल्ड को प्राईड पुरस्कार मिळाला आहे.

जाहिरात
पुणे येथे कॉसमॉस बँकेच्या सभागृहामध्ये ग्रीन वर्ल्ड पब्लिकेशन आणि कॉसमॉस बँक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सहकार मतदान 2025 या कार्यक्रमांमध्ये राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते हा पुरस्कार चेअरमन सुधाकर जोशी, व्हाईस चेअरमन ॲड.नानासाहेब शिंदे मुख्य कार्यकारी अधिकारी सुशील गुजराती यांनी स्वीकारला.

जाहिरात

सहकामहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श शिस्तीवर बँकेची वाटचाल सुरू असून लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली बँकेने नुकताच 1100 कोटींच्या व्यवसायाचा टप्पा पार केला आहे. अकरा शाखा आणि एक विस्तार कक्षाच्या माध्यमातून व्यवसायात मोठी झेप घेतली असून बँकेचा नफा दिवसेंदिवस वाढत आहे बँकेच्या ठेवी 683 कोटी असून 465 कोटी रुपयांचे कर्जवाटप झाले आहे.

यावेळी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील म्हणाले की, लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेरचा सहकार हा राज्यासाठी दिशादर्शक ठरला आहे. बँकिंग व्यवसाय अवघड असतानाही अमृतवाहिनी बँकेने सर्वसामान्यांच्या जीवनात आनंद निर्माण करत चांगला व्यवसाय केला आहे गुणवत्ता पूर्ण कामकाज हे या बँकेचे वैशिष्ट्य असल्याचे ते म्हणाले.

तर सुधाकर जोशी म्हणाले की, बँकेने ऑनलाईन प्रणाली सह फोन पे, डेबिट कार्ड, क्यू आर कोड, एटीएम यांसह अत्याधुनिक सुविधा दिल्या आहेत सातत्यपूर्ण गुणवत्ता पूर्ण कामाचा हा लौकिक असून हे सांघिक यश असल्याचे ते म्हणाले.

बँकेच्या या यशाबद्दल लोकनेते बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ.सुधीर तांबे,आमदार सत्यजित तांबे, ॲड.माधवराव कानवडे, पांडुरंग पाटील घुले,रणजितसिंह देशमुख, सौ.दुर्गाताई तांबे, डॉ जयश्रीताई थोरात, नूतन नगराध्यक्ष डॉ.मैथिली ताई तांबे, शंकरराव खेमनर, संपतराव डोंगरे, इंद्रजीत भाऊ थोरात,हौशीराम सोनवणे,रामहरी कातोरे,राजेंद्र गुंजाळ, राजेंद्र कडलग, अजय फटांगरे,सोमेश्वर दिवटे, यांच्यासह विविध मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे