आपला जिल्हा
डॉ.जयश्रीताई थोरात यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेला दिली भेट

संगमनेर विजय कापसे दि ३ नोव्हेंबर २०२५– संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा टेमगिरे वस्ती येथील सौ.अर्चना संदीप टेमगिरे यांच्यावर बिबट्याने हल्ला केला. या बिबट्याच्या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या असून कॅन्सरतज्ञ डॉ.जयश्रीताई थोरात यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांची आस्थेवाईकपणे चौकशी करून त्यांना धीर दिला.








