आपला जिल्हा

पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांचा जयंती दिवस शेतकरी दिन म्‍हणुन साजरा

पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांचा जयंती दिवस शेतकरी दिन म्‍हणुन साजरा

पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांचा जयंती दिवस शेतकरी दिन म्‍हणुन साजरा

जाहिरात

लोणी विजय कापसे दि ८ ऑगस्ट २०२५सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांचा जयंती दिन हा शेतकरी दिन म्‍हणुन साजरा करण्‍याचा निर्णय राज्‍याच्‍या कृषि, पशुसंवर्धन, दुग्‍ध व्‍यवसाय, विकास व मत्‍सव्‍यवसाय विभागाने घेतला आहे. डॉ.विखे पाटील यांनी शेतक-यांकरीता केलेल्‍या कार्याचे स्‍मरण व्‍हावे व राज्‍यातील सर्व शेतक-यांचा सन्‍मान म्‍हणुन ८आॅगस्ट २०२५ रोजी नारळी पौर्णिमेच्‍या दिवशी असलेला त्‍यांचा जन्‍मदिवस हा शेतकरी दिन म्‍हणुन साजरा केला जातो.

जाहिरात

पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांचा तिथीप्रमाणे येणारा जन्‍मदिवस हा शेतकरी दिन म्‍हणुन साजरा करण्‍याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्‍यानुसार दरवर्षी शासनाच्‍या वतीने कृषि व पशुसंवर्धन विभाग हा शेतकरी दिन सर्वत्र साजरा होण्‍याच्‍या दृष्‍टीने निर्देश निर्गमित करीत असते. याही वर्षी दि.८आॅगस्ट २०२५ रोजी राज्य सरकारने शेतकरी दिन साजरा करण्‍यास मान्‍यता दिली आहे.

जाहिरात

शेतकरी दिनाच्‍या निमित्‍ताने शेतकरी मेळावे व कृषि क्षेत्रासंबधात मार्गदर्शनपर कार्यक्रम आयोजित करुन, शेतक-यांचा संन्‍मान करण्‍याबाबत कृषि विभागाने सुचित केलेले आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे