अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेजच्या कॉम्प्युटर मधील ७० विद्यार्थ्यांना मोठ्या पॅकेजवर नोकरी

अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेजच्या कॉम्प्युटर मधील ७० विद्यार्थ्यांना मोठ्या पॅकेजवर नोकरी
७.०२ सर्वोच्च पॅकेजवर विद्यार्थ्यांची निवड
Sangmner vijay kapse दि २५ मे २०२६–महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयातील कॉम्प्युटर विभागातील ७० विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये थेट नोकऱ्या मिळाल्या असून यामधील काही विद्यार्थ्यांना ७.०२ पॅकेजवर नोकरी मिळाली असल्याची माहिती प्राचार्य डॉ एम ए वेंकटेश यांनी दिली आहे.

विद्यार्थ्यांच्या नोकरी विषयी माहिती देताना प्राचार्य डॉ व्यंकटेश म्हणाले की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च तांत्रिक शिक्षणाबरोबर त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये सातत्याने विविध उपक्रम राबवले जात आहेत याचबरोबर विद्यार्थ्यांना चांगल्या नोकऱ्या मिळावा याकरता राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांबरोबर समन्वय करार करण्यात आला आहे.

यामधून कॉग्निजंट, इन्फोसिस, बॉस ,टीसीएस डिजिटल, लेन्स एल क्यूब , विन्सोफ्ट, पि99 , पायथर, सॉलेट इन्फोटेक,अशा विविध कंपन्यांमध्ये कॉम्प्युटर इंजीनियरिंग विभागातील ७० विद्यार्थ्यांची निवड झाली आहे यामधील काही विद्यार्थ्यांना ७.०२ या पॅकेजवर निवडण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांना नवीन तंत्रज्ञानाची माहिती मिळावी व सर्वांगीण कौशल्य विकासाचे ज्ञान प्राप्त व्हावे याकरता सेंटर ऑफ एक्सलेन्स फॉर ए आय, इएसडीएस क्लाऊड सेंटर ,ॲमेझॉन, आयएसटीई, स्टुडन्ट चाप्टर च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची प्रशिक्षण दिले जात आहे. याचबरोबर विद्यार्थ्यांना उद्योगाभिमुख बनवण्यासाठी इंटरशिप इंडस्ट्रियल व्हिजिट टेक्निकल ट्रेनिंग अँप स्टेटस आणि सॉफ्ट स्कील सेशन अशा विविध उपक्रमांचे आयोजन केले जात आहे कॉम्प्युटर विभागातील विद्यार्थ्यांनी हॅकेथॉन स्पर्धांमध्ये यश मिळवत लाखो रुपयांची बक्षिसे मिळवली आहेत.

या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना विभाग प्रमुख डॉ.श्रीनिवास सोनकर, प्लेसमेंट अधिकारी प्रा प्रवीण वाकचौरे, प्रा सचिन गडाख यांचे मार्गदर्शन लाभले.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे माजी महसूल मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात, मा आ डॉ सुधीर तांबे, संस्थेच्या कार्यकारी विश्वस्त शरयू देशमुख,मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, अकॅडमिक डायरेक्टर डॉ जे बी गुरव, प्राचार्य डॉ एम ए व्यंकटेश, रजिस्टर प्रा विजय वाघे, यांच्यासह विविध मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.



