कोपरगाव विजय कापसे दि ११ डिसेंबर २०२५–नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या अँटी करप्शन बोर्ड न्यू दिल्ली यांचे नुकतेच महाराष्ट्र राज्य द्वितीय राज्यस्तरीय अधिवेशन व गुणगौरव सोहळा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आर के जैन यांच्या अध्यक्षतेखाली तसेच कॅप्टन अशोक कुमार खरात व संस्थेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अण्णासाहेब खैरनार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला .
जाहिरात
गुरुवार दि ११ डिसेंबर रोजी सिन्नर येथील हॉटेल संस्कृती बँक्वेट हॉलमध्ये झालेल्या या दिमाखदार सोहळ्यात कोपरगाव येथील प्रसिद्ध विनोदी कलाकार, झी टॉकीज फेम सुपरस्टार व होम मिनिस्टर फेम संदीप जाधव यांना कलारत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे.जाहिरात
संदीप जाधव यांना कोणतेही कोणते तज्ञ मार्गदर्शन नसताना स्वतःच्या बुद्धीवर आपल्या कलेचा योग्य वापर करत संपूर्ण राज्यभर नाव कमावले त्यांच्या याच कलागुणांची शब्बासकी म्हणून त्यांना अँटीकरप्शन बोर्ड नवी दिल्ली यांच्या वतीने कलारत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे ही नक्कीच कोपरगावकरांसाठी अभिमानास्पद बाब असून त्यांचा झालेला या सन्मानाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.