डॉ राजदेव यांनी स्थानिक इतिहास संशोधनाला प्रोत्साहन दिले – प्रा. बाबा खरात

इतिहास माणसाला घडवतो- डॉ त्रंबक राजदेव

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयातील केबी दादा सभागृहात इतिहास विभागाचे प्रा. डॉक्टर त्रिंबक राजदेव यांच्या सेवापूर्ती कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्राचार्य डॉ बाळासाहेब वाघ, सौ.संगीता राजदेव, एस एम खेमनर, डॉ.डी डी पवार ,डॉ विलास कोल्हे, गोरक्षनाथ पानसरे, प्रा लक्ष्मण घायवट, प्रा गणेश गुंजाळ ,नामदेव कहांडळ, स्नेहल थिटने, गणेश राजदेव , डॉ बैरागी आदी उपस्थित होते.

डॉ.त्रिंबक राजदेव यांच्या सेवापूर्ती बद्दल माजी शिक्षण मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी त्यांचा सत्कार केला यावेळी निवृत्त प्राचार्य केशवराव जाधव उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना प्रा. बाबा खरात म्हणाले की, सेवानिवृत्ती हा जीवनातील एक आनंदाचा क्षण आहे. ज्ञान असेल तर मान मिळतो. शिक्षकांनी सेवानिवृत्तीनंतरही कायम समाजाच्या प्रगतीसाठी काम केले पाहिजे डॉक्टर राजदेव यांनी स्थानिक इतिहास संशोधनाला मोठे प्रोत्साहन दिले आहे यापुढील काळातही संगमनेर मधील इतिहास संशोधनासाठी विद्यार्थ्यांना घेऊन त्यांनी काम करावे असे आव्हान त्यांनी केले.

तर डॉ राजदेव म्हणाले की, लोकनेते बाळासाहेब थोरात व मा. आ. डॉ सुधीर तांबे यांच्या नेतृत्वाखाली सह्याद्री महाविद्यालयाने राज्यात आपला लौकिक निर्माण केला आहे. प्रत्येक माणसाला इतिहास असून आपला स्थानिक इतिहास प्रत्येकाने अभ्यासला पाहिजे याकरता महाविद्यालयात स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात आला असून या माध्यमातून काम सुरू असल्याचे ते म्हणाले.
तर डॉ बाळासाहेब वाघ म्हणाले की, सह्याद्री हा एक परिवार असून विद्यार्थी केंद्रबिंदू मानून व त्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व विभागांनी काम केले आहे. नम्रता आणि गुणवत्ता असेल तर विद्यार्थ्यांना मोठे यश मिळेल असे ते म्हणाले.
याप्रसंगी ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य एस एम खेमनर, प्रा गणेश गुंजाळ , डॉ विलास कोल्हे, प्रा.माधव जाधव,नामदेव कहांडळ गणेश राजदेव यांनी आपली मनोगते व्यक्त केली.
प्रा. स्नेहल थिटमे यांनी सूत्रसंचालन केले .तर लक्ष्मण घायवट यांनी आभार मानले. यावेळी महाविद्यालयातील शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



