तालुक्यात पहिल्यांदाच केळीची यशस्वी लागवड – शेतकऱ्याला उत्तम उत्पादन व उत्पन्नाचा नवा मार्ग
तालुक्यात पहिल्यांदाच केळीची यशस्वी लागवड – शेतकऱ्याला उत्तम उत्पादन व उत्पन्नाचा नवा मार्ग
जाहिरात
कोपरगाव विजय कापसे दि ३ जानेवारी २०२५– तालुक्यातील करंजी येथील शेतकरी अतुल रमेश बोठे यांनी महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) अंतर्गत केळी पिकाची यशस्वी लागवड करून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या उपक्रमामुळे कोपरगाव तालुक्यात प्रथमच केळीची लागवड यशस्वी ठरली असून, शेतकऱ्यांना उत्पन्नाचा नवा आणि शाश्वत स्रोत उपलब्ध झाला आहे. ही लागवड जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे , तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे , मंडळ कृषी अधिकारी साईनाथ मलिक , उप कृषी अधिकारी संजय घनकुटे तसेच सहाय्यक कृषी अधिकारी शुभांगी निकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. योग्य नियोजन, आधुनिक कृषी तंत्रज्ञान, मृदा व पाणी व्यवस्थापन यांचा अवलंब केल्याने केळीचे पीक उत्तम वाढीस लागले असून भरघोस उत्पादन मिळाले आहे.
जाहिरात
या केळी पिकातील उत्कृष्ट फळांचा नमुना ‘शेतकरी संवाद बाबळेश्वर’ येथे आयोजित प्रदर्शनात सादर करण्यात आला. हे प्रदर्शन कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या भेटीसाठी आयोजित करण्यात आले होते. या प्रसंगी कोपरगाव तालुक्यातील पहिल्याच केळी लागवडीचे यश सर्वांच्या लक्षात आले.जाहिरात
सदर प्रसंगी प्रगतशील शेतकरी अजित बोठे, समाधान कोल्हे, संकेत बोठे, निरंजन भिंगारे हेही उपस्थित होते. अतुल बोठे यांच्या या उपक्रमामुळे परिसरातील शेतकऱ्यांना नवी प्रेरणा मिळाली असून, कमी कालावधीत अधिक उत्पादन आणि चांगले उत्पन्न मिळवून देणारे पीक म्हणून केळीची लागवड तालुक्यात विस्तारण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मनरेगाच्या माध्यमातून कृषी विकासाला चालना देणारा हा आदर्श उपक्रम ठरत असून, शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.