भूमिगत गटार काम गैरव्यवहाराचा राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांचा कबुलीनामा – निलोफर पठाण
भूमिगत गटार काम गैरव्यवहाराचा राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांचा कबुलीनामा – निलोफर पठाण
जाहिरात
कोपरगाव विजय कापसे दि २२ जानेवारी २०२६–कोपरगाव शहरात सुरू असलेल्या भूमिगत गटारीच्या कामावरून सामाजिक कार्यकर्त्यांनी सुरू केलेल्या उपोषणामुळे तत्कालीन आमदारांच्या कार्यकाळातील कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे या कामासंदर्भात खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्तेच हे काम आमदार काळे यांच्या कार्यकाळात सुरू झाल्याची कबुली देत असल्याने, या संपूर्ण प्रकरणात झालेला भ्रष्टाचार, निकृष्ट दर्जा व प्रशासनिक निष्क्रियतेची जबाबदारी नेमकी कोणाची याचा शोध घेणे आवश्यक ठरत आहे.
जाहिरात
एकीकडे उपोषणकर्त्यांना भेट देत सहानुभूतीचा दिखावा करायचा आणि दुसरीकडे या कामावर झालेल्या आरोपांपासून स्वतःची बाजू वाचवण्यासाठी चमडी बचाव धोरण स्वीकारायचे, अशी दुटप्पी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसकडून उघडपणे समोर येत आहे. जनतेने स्पष्टपणे नाकारल्यानंतरही काळे गटाकडून सतत चुका लपवण्याचा आणि जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न केला जात आहे, हे दुर्दैवी आहे.जाहिरात
नुकतीच कोल्हे गटाची सत्ता आल्यानंतर सदर काम मंजूर करण्यात आलेले नाही किंवा त्यामध्ये कोल्हे गटाचा कोणताही सहभाग नाही, हे खुद्द उपोषणकर्त्यांनीही स्पष्ट केले आहे. त्यामुळे हे भूमिगत गटारीचे काम कोणाच्या आशीर्वादाने, कोणाच्या काळात आणि कोणत्या हेतूने देण्यात आले, हा खरा प्रश्न आज नागरिक विचारत आहेत.यामागील असणारा डॉन कोण हे उपोषणकर्त्यांनी अंगुलीनिर्देश केलेला आहे याचा विचार काळे गटाने करावा.बांधकाम सभापती निलोफर पठाण
कोपरगावच्या विकासाच्या नावाखाली जर जनतेच्या पैशांचा गैरवापर झाला असेल, तर त्याची चौकशी होणे गरजेचे असून दोषींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे. सत्य लपवून विकास होत नसतो, तर पारदर्शकता आणि जबाबदारीतूनच खरा विकास साध्य होतो, अशी ठाम भूमिका बांधकाम सभापती निलोफर पठाण यांनी व्यक्त केली आहे.
कोपरगाव शहरात गत चार वर्षात झालेल्या अमाप भ्रष्टाचाराने तिजोरी रिकामी करून नागरिकांच्या पैशांचा चुराडा करणाऱ्यांना जनतेने नाकारून सत्तेपासून दूर ठेवले आहे याचे आत्मपरीक्षण त्यांनी करावे.
तीन हजार कोटींची तुमची खोटी शिट्टी जनतेने ओळखली आहे त्यामुळे आता विकासाच्या वाजलेल्या शिट्टीने विरोधकांच्या कानात त्रास होतो आहे असा उपरोधिक टोला यावेळी लगावला आहे.