आपला जिल्हा

डाऊच बु.जि.प. शाळा व अंगणवाडीच्या खोलीचे भूमिपूजन व लोकार्पण संपन्न

डाऊच बु.जि.. शाळा व अंगणवाडीच्या खोलीचे भूमिपूजन व लोकार्पण संपन्न

दर्जेदार शिक्षणासाठी पायाभूत सुविधा अत्यंत महत्त्वाच्या- आ. आशुतोष काळे

जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि २४ जानेवारी २०२६शिक्षणाचा पाया मजबूत असेल तरच भविष्यात सक्षम, सुसंस्कृत आणि आत्मविश्वासू पिढी घडू शकणार आहे. लहान वयातच योग्य वातावरण, सुरक्षित इमारत आणि आवश्यक सुविधा मिळाल्यास मुलांच्या शैक्षणिक वाटचालीला योग्य दिशा मिळते. त्यामुळे दर्जेदार शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांचा विकास करणे ही काळाची गरज असून दर्जदार शिक्षणासाठी पायाभूत सुविधा अत्यंत महत्वाच्या असल्याचे प्रतिपादन आ.आशुतोष काळे यांनी केले आहे.

जाहिरात

कोपरगाव मतदारसंघातील डाऊच बु. येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खोलीच्या कामाचे भूमिपूजन तसेच अंगणवाडी शाळेच्या खोलीचे लोकार्पण आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते शुक्रवार (दि.२३) रोजी मोठ्या उत्साहात पार पडले या प्रसंगी ते बोलत होते.यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले कीग्रामीण भागातील शैक्षणिक सुविधा सक्षम करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. अंगणवाडीच्या नवनिर्मित खोलीमुळे माता-पालकांचीही चिंता कमी होणार असून लहानग्यांना सुरक्षित,स्वच्छ आणि पोषक वातावरणात शिक्षण व संस्कार मिळणार आहेत. तसेच जिल्हा परिषद शाळेच्या नव्या खोलीमुळे विद्यार्थ्यांना अधिक सुविधा उपलब्ध होऊन शिक्षणाची गुणवत्ता वाढण्यास मदत होईल.लहानग्यांचे भविष्य उज्वल करण्यासाठी शिक्षण, आरोग्य आणि पोषण या तीनही घटकांवर भर देत विकासकामे सातत्याने राबवली जातील अशी ग्वाही आ.आशुतोष काळे यांनी यावेळी दिली.

जाहिरात

 याप्रसंगी ह.भ.प. मनसुख महाराज दहेकर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक शंकरराव चव्हाणधर्मा दहेभिवराव दहेबाजीराव होनसरपंच दिनेश गायकवाडउपसरपंच संजय ढमालेडाऊच खु.चे सरपंच संजय गुरसळशिवाजी दहेजयवंत दहेसुनिल बढेगोरख दहेरामनाथ जाधवबापू दहेअक्षय दहेयोगेश दहेबाबासाहेब होनसंजय गायकवाडतुळशीराम दहेभाऊसाहेब दहेदेवेंद्र दहेदगु गायकवाडकेशव बढेकाशिनाथ दहेदादासाहेब दहेभाऊसाहेब दहेपोपटराव दहेरामदास दहेगणेश दहेकैलास पवारमच्छिंद्र ढमालेकांतीलाल दहेपन्नालाल दहेबाळासाहेब दहेसंकेत दहेकिरण पवारविलास चव्हाण ग्रामपंचायत सदस्यस्थानिक शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्यशिक्षकवर्गअंगणवाडी सेविकाराष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारीकार्यकर्तेविद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे