आपला जिल्हा

कोणतीही पूर्व सूचना न देता आठवडे बाजारच्या दिवशी कोपरगाव नगरपरिषदेची अतिक्रमण हटाव कारवाई, छोट्या व्यावसायिकांची नुकसान भरपाई कोण देणार?-नगरसेवक बाळासाहेब रुईकर

कोणतीही पूर्व सूचना न देता आठवडे बाजारच्या दिवशी कोपरगाव नगरपरिषदेची अतिक्रमण हटाव कारवाई, छोट्या व्यावसायिकांची नुकसान भरपाई कोण देणार?-नगरसेवक बाळासाहेब रुईकर

कोणतीही पूर्व सूचना न देता आठवडे बाजारच्या दिवशी कोपरगाव नगरपरिषदेची अतिक्रमण हटाव कारवाई, छोट्या व्यावसायिकांची नुकसान भरपाई कोण देणार?-नगरसेवक बाळासाहेब रुईकर

कोपरगाव विजय कापसे दि २ फेब्रुवारी २०२६- कोपरगाव नगरपरिषदेच्या वतीने सोमवार (दि.२) रोजी आठवडे बाजारच्या दिवशी छोट्या व्यावसायिकांना कोणतीही पूर्व सूचना न देता  शहरातील मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमणा विरोधात अचानक कारवाई करण्यात आल्यामुळे छोट्या व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले असून हि नुकसान भरपाई कोण देणार असा प्रश्न राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक बाळासाहेब रुईकर यांनी कोपरगाव नगरपरिषदेला विचारला आहे. 

जाहिरात

सोमवार हा कोपरगावचा आठवडे बाजाराचा दिवस असतो. या दिवशी ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणावर छोटे-मोठे व्यावसायिक, शेतकरी व फेरीवाले कोपरगाव शहरात येऊन भाजीपाला, फळे, धान्य व विविध किरकोळ वस्तूंची विक्री करून आपला उदरनिर्वाह करतात. मात्र बेजबाबदार कोपरगाव नगरपरिषदेकडून कोणतीही पूर्व सूचना न देता अचानकपणे या व्यवसायिकांवर कारवाई करण्यात आल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

जाहिरात

बाजाराच्या दिवशी कारवाई सुरू केल्यामुळे व्यापाऱ्यांना आणि शेतकऱ्यांना आपला माल उचलण्याची संधी देखील नगरपरिषद प्रशासनाने मिळू दिली नाही. काही व्यापाऱ्यांना आपला माल काडीमोल भावाने विकावा लागला, तर काहींना माल फेकून द्यावा लागला तर काही माल नगरपरिषद प्रशासनाने उचलून नेल्याने या व्यावसायिकांच्या झालेल्या नुकसानानीची जबाबदारी कोण घेणार? आणि नगरपरिषद प्रशासनाने त्यांना नुकसान भरपाई देणार का? असा प्रश्न नगरसेवक बाळासाहेब रुईकर यांनी विचारला आहे.

जाहिरात

जर नगरपरिषद प्रशासनाने या व्यावसायिकांना पूर्वसूचना दिली असती तर व्यापाऱ्यांनी मालाची खरेदीच केली नसती मात्र पूर्वसूचना द्यायची नाही आणि अचानक करण्यात कारवाई करायची ही नगरपरिषद प्रशासनाची दादागिरी असून त्यामुळे छोट्या व्यवसायिकांवर अन्याय करण्यात आला आहे. त्यामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देवून या व्यावसायिकांना नगरपरिषद प्रशासनाने दिलासा द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक बाळासाहेब रुईकर यांनी केली आहे.

जाहिरात

या करण्यात आलेल्या कारवाईबाबत कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकाऱ्यांनी नगराध्यक्षांना कोणतीही माहिती नसल्याचे प्रशासनाच्या वतीने केलेले वक्तव्य अतिशय हास्यस्पद असून नगराध्यक्षांना न विचारता निर्णय घेतले जातात का? नगराध्यक्षांचे नगर परिषदेकडे लक्ष आहे का नाही?याबद्दल शंका उपस्थित होत असल्याचे नगरसेवक बाळासाहेब यांनी म्हटले आहे.

बाळासाहेब रुईकर

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे