आपला जिल्हा

जनहिताला पहिल्याच दिवशी काळे गटाकडून मिठाचा खडा : विद्याताई सोनवणे

जनहिताला पहिल्याच दिवशी काळे गटाकडून मिठाचा खडा : विद्याताई सोनवणे
जनहिताला पहिल्याच दिवशी काळे गटाकडून मिठाचा खडा : विद्याताई सोनवणे
जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि ३ फेब्रुवारी २०२६कोपरगाव शहर हिताच्या विविध तरतुदी कोपरगाव नगरपरिषद अर्थसंकल्प 2026 – 27 मध्ये करण्यात आल्या. या अर्थसंकल्पात गरीब विद्यार्थ्यांसाठी उज्वल भविष्याच्या दृष्टिकोनातून भरीव तरतूद करण्यात आली. महिलांच्या स्वच्छतागृहाचा प्रश्न ऐरणीवर असताना तो सोडवण्यासाठी दूरगामी निर्णय घेण्यात आला. कोपरगाव शहरातील उद्यानांची भयान अवस्था बदलवण्यासाठी सुशोभीकरणाच्या दृष्टिकोनातून अधिकची तरतूद करून ठेवण्यात आली. यासह शहराला आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने सज्ज ठेवण्यासाठी आपत्ती व्यवस्थापनाचा राखीव निधीची तरतूद करून ठेवण्यात आली कदाचित या सर्व बाबी शहर हिताच्या नाही असा विरोधकांना वाटते म्हणूनच त्यांनी पहिल्याच स्थायी समितीच्या बैठकीत आपल्या अल्प बुद्धीच्या मिठाचा खडा या अर्थसंकल्पावरती टीका करून टाकला आहे अशी जळजळीत टीका स्थायी समिती सदस्या विद्याताई सोनवणे यांनी विरोधकांवर केली आहे.

जाहिरात
स्वतः प्रशासक काळात कवडीचेही योगदान शहर विकासात द्यायचे नाही आणि त्यांच्या प्रतिनिधींनी शहर विकासाच्या प्रश्नांसाठी करण्यात आलेल्या तरतुदीवर विनाभ्यास तारे तोडायचे हे दुर्दैवी आहे. महिला भगिनींच्या स्वच्छतागृहाचा प्रश्न हा किती महत्त्वाचा आहे याची जाणीव टीका करणाऱ्या विरोधकांनी आपल्याच कुटुंबातील माता-भगिनींना प्रश्न विचारून करावी म्हणजे त्यांना हा अर्थसंकल्प किती उपयोगी आहे याची जाणीव झाल्याशिवाय राहणार नाही.

जाहिरात
मुळात शासनाने प्रभाग निहाय अर्थसंकल्प सादर करण्याची कुठेही तरतूद केलेली नाही अथवा प्रभागनिहाय अर्थसंकल्प सादर करावा अशा प्रकारची रचना देखील नाही. मात्र विरोधी नगरसेवक जनार्दन कदम यांनी प्रभाग निहाय अर्थसंकल्पात काय तरतुदी केल्या हे विचारण्याचा बाळबोधपणा आपल्या अज्ञानातून स्पष्ट केला आहे. कारण अर्थसंकल्प हा संपूर्ण शहरासाठी असतो तो एखाद्या विषिष्ठ प्रभागाचा नसतो. यापूर्वी नगरसेवक म्हणून त्यांनी भुषवलेला कार्यकाळ हा केवळ मिरवण्यापुरता होता का ? तो अभ्यासापुरता नव्हता असेच या त्यांच्या टिके वरून स्पष्ट होते अशी प्रतिक्रिया सोनवणे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

जाहिरात
विरोधकांनी टीका करण्याआधी हे स्पष्ट करावे गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठीची तरतूद चुकीची आहे का? महिलांच्या स्वच्छतेसाठी घेतलेले निर्णय अनावश्यक आहेत का? उद्यानांचे सुशोभीकरण आणि आपत्ती व्यवस्थापनासाठीचा निधी शहराच्या हिताचा नाही का? या प्रश्नांची प्रामाणिक उत्तरे देण्याची तयारी असेल, तरच त्यांची टीका गांभीर्याने घेतली जाईल, अन्यथा ही टीका जनतेसमोर उघडी पडल्याशिवाय राहणार नाही, असेही सोनवणे यांनी ठामपणे नमूद केले.

नगरसेविका विद्याताई सोनवणे
 पाणीपुरवठा विभागाची पट्टी कुणाच्या आशीर्वादाने थकली हे अल्पावधीत राजकीय उडी मारून पावन झालेल्यांनी अभ्यास करावा असेही यावेळी सुनावण्यात आले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे