आपला जिल्हा

अहिल्यानगर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने अजितदादा पवार यांना श्रद्धांजली

अहिल्यानगर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने अजितदादा पवार यांना श्रद्धांजली

अहिल्यानगर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने अजितदादा पवार यांना श्रद्धांजली

जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि ३ फेब्रुवारी २०२६नुकतेच राज्याचे कर्तव्यनिष्ठ उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार यांचे विमान अपघातात बारामती येथे दुःखद निधन झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे  तर संबंध राज्यात अनेक ठिकाणी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली जात आहे. त्याच अनुषंगाने अहिल्यानगर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने पक्ष कार्यालयात दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली

जाहिरात
 याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष ॲड.संदीप वर्पे, शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर, राहता युवक अध्यक्ष अक्षय गोडे, निलेश मालपाणी, राम वाणी, शरद पवार,  अथर खान, अभिषेक जगताप, चंद्रकांत उजागरे,फारूक रंगरेज, रोहन शेलार, पापामिया शेख, किरण सपकळ, सचिन नवगिरे, चैतन्य ससे, गौरव शेटे, परवेज शेख, समीर पठाण, लक्ष्मण कुऱ्हाडे आदिसह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अहिल्यानगर जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दिवंगत अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत श्रद्धांजली वाहिली तर  याप्रसंगी अनेकांनी दादांच्या आठवणींना उजाळा दिला.

जाहिरात
दोन दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष ॲड.संदीप वर्पे
यांनी बारामती येथे गोविंद बागेत जात ज्येष्ठ नेते खा. शरदचंद्र पवार व सबंध पवार कुटुंबाची सांत्वन पर भेट घेतली या प्रसंगी त्यांच्या समवेत संतोष वढणे हे देखील उपस्थित होते.

जाहिरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे