के.जे.सोमैया महाविद्यालय डीबीटी स्टार योजनेंतर्गत तालुक्यातील विविध महाविद्यालयात वैज्ञानिक उपक्रमांचे सादरीकरण

के.जे.सोमैया महाविद्यालय डीबीटी स्टार योजनेंतर्गत तालुक्यातील विविध महाविद्यालयात वैज्ञानिक उपक्रमांचे सादरीकरण
के.जे.सोमैया महाविद्यालय डीबीटी स्टार योजनेंतर्गत तालुक्यातील विविध महाविद्यालयात वैज्ञानिक उपक्रमांचे सादरीकरण

कोपरगाव विजय कापसे दि ३ फेब्रुवारी २०२६– के. जे. सोमैया (वरिष्ठ) व के.बी. रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयाला केंद्र सरकारच्या बायोटेक्नॉलॉजी विभाग, विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय, नवी दिल्ली यांचेकडून स्टार कॉलेज योजनेअंतर्गत अनुदान मान्यता मिळालेली असून या योजनेंतर्गत तालुक्यातील विविध महाविद्यालयात वैज्ञानिक उपक्रमांचे सादरीकरण करण्यात आल्याची माहिती प्राचार्य डॉ. विजय ठाणगे यांनी दिली. ते पुढे म्हणाले की, डीबीटी स्टार योजनेंतर्गत महाविद्यालयातील विज्ञान व तंत्रज्ञान शाखेच्या रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, भौतिकशास्त्र हे विभाग कार्यरत असून या विभागातील प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्याच्या उद्देशाने परिसरातील कनिष्ठ महाविद्यालयात विविध वैज्ञानिक उपकरणाची माहीती व प्रात्यक्षिक सादर केले.

या महाविद्यालयांमध्ये आत्मा मालिक कनिष्ठ महाविद्यालय कोकमठाण, के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालय जवळके व के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालय चास यांचा समावेश आहे. या उपक्रमात महाविद्यालयातील डीबीटी स्टार योजनेचे समन्वयक डॉ. एस. जी. कोंडा, डॉ. गणेश शिंदे, डॉ. नितिन शिंदे, डॉ. निलेश पोटे यांचे आजचा विद्यार्थी व वैज्ञानिक दृष्टीकोण या विषयांवर प्रात्यक्षिकातुन सखोल मार्गदर्शन संपन्न झाले. या उपक्रमांतर्गत माती परीक्षण, विद्यार्थ्यांचा रक्तगट तपासणी, सूक्ष्म जीव वाढ व संसर्ग मोजणी यांचे प्रात्यक्षिके दाखविण्यात आले. यावेळी मानवी शरीरातील जैविक रसायनांची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. तसेच या जैविक रसायनांची उपकरणाच्या साह्याने मोजणीचे प्रात्यक्षिकही दाखविण्यात आले. या उपक्रमांसाठी कोकमठाण येथील आत्मा मालिक महाविद्यालयाचे प्राचार्य डांगे सर, जवळके महाविद्यालयाचे उपप्राचार्य रहाणे सर व चास महाविद्यालयाचे उपप्राचार्य रणधीर सर यांचे सर्वतोपरी सहकार्य लाभले.

या उपक्रमाला को. ता. एज्यु. सोसायटीचे अध्यक्ष मा. अशोकराव रोहमारे, विश्वस्त मा. संदिपराव रोहमारे, प्राचार्य प्रो. विजय ठाणगे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. या वैज्ञानिक उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. एन. आर. दळवी, भौतिकशास्त्र विभागप्रमुख डॉ. बी.बी.भोसले, वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. बी. एस. गायकवाड, प्राणीशास्त्र विभागप्रमुख डॉ. आर. डी गवळी व सूक्ष्मजीवशास्त्र विभागप्रमुख प्रा. व्ही.आर. मगर, रजिस्ट्रार डॉ. अभिजित नाईकवाडे, संजय पाचोरे यांनी विशेष परिश्रम घेतले.








