जयहिंदच्या वतीने १८ व १९ जानेवारीला अमेझिंग किड्स ऑफ इंडियाचे आयोजन
लहान मुलांसाठी कला व क्रीडा स्पर्धा होणार
या स्पर्धेबाबत अधिक माहिती देताना ते म्हणाले की जय हिंद लोक चळवळीच्या वतीने लहान मुलांच्या विकासाकरता माजी शिक्षण मंत्री बाळासाहेब थोरात व माजी आमदार डॉ सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने विविध उपक्रम राबवले जात आहेत. यामुळे संगमनेर तालुका हा उच्च शैक्षणिक केंद्राबरोबर उपक्रमशील तालुका म्हणून ओळखला जातो. शनिवार दिनांक १८ व १९ जानेवारी २०२५ रोजी सकाळी १० ते ५ या वेळेत लहान मुलांच्या विविध स्पर्धा होणार आहेत यामध्ये ॲथलेटिक ड्रॉइंग म्युझिक स्केचिंग डान्स अशा विविध प्रकारच्या स्पर्धा आहेत याचबरोबर पंधरा वर्षापासून पुढे मुलांच्या शारीरिक व कलात्मक कौशल्य विकसित करण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे.
या स्पर्धेचे उद्घाटन माजी मंत्री बाळासाहेब थोरात माजी आमदार डॉ. सुधीर तांबे ,आमदार सत्यजित तांबे, सौ दुर्गाताई तांबे ,डॉ .जयश्रीताई थोरात यांच्या उपस्थितीमध्ये शनिवारी सकाळी ११ वाजता होणार आहे. तरी या स्पर्धेमध्ये विविध शाळेच्या विद्यार्थ्यांना विनामूल्य प्रवेश असून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा यासाठी पालकांनी ही पुढाकार घ्यावा असे आवाहन जय हिंद लोक चळवळीच्या स्पोर्ट्स कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.