लायन्स एक्स्पो व सांस्कृतिक महोत्सवास गुरुवार पासून सुरुवात
कोपरगाव करासाठी खरेदी व सांस्कृतिक कार्यक्रमाची मोठी महापर्वणी
कोपरगाव विजय कापसे दि ५ फेब्रुवारी २०२६– कोपरगावकर ज्या महोत्सवाची आतुरतेने वाट पाहत असतात, असा लायन्स बिझनेस एक्स्पो व सांस्कृतिक महोत्सव २०२६ याची भव्य सुरुवात दि. १२ फेब्रुवारी २०२६ रोजी अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी पंकज आशिया यांच्या शुभहस्ते होणार आहे. हा महोत्सव ५ दिवसांचा असून यामध्ये एकूण २११ विविध प्रकारचे स्टॉल्स असणार आहेत. या मध्ये प्रॉपर्टी व बिल्डिंग मटेरियल चे स्वंतत्र डोम उभारण्यात आला आहे. तसेच विविध प्रकारचे खाद्य पदार्थाचे स्टॉल असणार आहे. ठराविक बचत गटा साठी मोफत स्टॉल देण्यात आले आहे. या पाचही दिवसांत दररोज विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आणेजन करण्यात आले आहे. अशी माहिती क्रेडाई अध्यक्ष राजेश ठोळे यांनी दिली.
एक्स्पो चे शिर्षक प्रायोजक कर्मवीर शंकरराव काळे उद्योग समूह, प्रायोजक संजीवनी उद्योग समूह आणि सम्राट वर्मा ग्रुप येवला सह प्रायोजक-गोदावरी दूध संघ व समता पतसंस्था यांनी स्वीकारले आहेत अशी माहिती ला सत्येन मुंदडा यांनी दिली. तसेच या वर्षी उत्सव कोपरगावकरांचा.भारतीय संस्कृतीचा यावर आधारित भारतातील ७ आश्चर्य हे एक्सपोचे मुख्य आकर्षण असणार आहे. अशी माहिती ला. सुरेश शिंदे यांनी दिली.
सांस्कृतिक महोत्सवा अंतर्गत भारतातील विविध राज्यांची वेशभूषा व परंपरा दर्शविणारी लोकनृत्य रॅली व सादरीकरण १२ फेब्रुवारी ला होणार आहे. तर १३ फेब्रुवारी रोजी सम्राट वर्मा ग्रुप प्रस्तुत डान्स कोपरगाव डान्स लहान गट या डान्स स्पर्धा प्रसिद्ध मराठी सिनेअभिनेत्री भाग्यश्री लिमये यांची विशेष उपस्थिती असणार आहे. तर १४ फेब्रुवारी रोजी सम्राट वर्मा ग्रुप प्रस्तुत डान्स कोपरगाव डान्स मोठा गट असे आयोजन केले आहे. दि. १५ फेब्रुवारी रोजी कोपरगावतील नाट्य रसिकांना मंच उपलब्ध करुन देण्यासाठी तुलसीदास आर खुबानी ज्वेलर्स प्रस्तुत कॉमेडी नाटक स्पर्धेचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमासाठी प्रसिद्ध रिल स्टार ऋषी हराळ व टिम यांची उपस्थिती असणार आहे. तसेच पारितोषिक वितरणासाठी प्रसिद्ध मराठी सिनेअभिनेत्री स्पृहा जोशी यांची विशेष उपस्थिती असणार आहे. शालेय विद्यार्थ्यांसाठी दुपारी चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, सुंदर हस्ताक्षर स्पर्धा घेण्यात येणार आहेत. अशी माहिती राम थोरे यांनी दिली.
या वर्षीचे मुख्य आकर्षण म्हणजे पेट कर्णिवल या मध्ये विविध प्रकारचे मत्स, पक्षी व पाळीव प्राणी यांचे प्रदर्शन असणार आहे. अशी माहिती सुमित भट्टड यांनी दिली. लायन्स क्लब हे सामाजिक बांधिलकी जपणारे क्लब असल्या मुळे कोपरगावकरांसाठी मोफत डोळे तपासणी आणि रक्तदान शिबिर व कॅन्सर जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. अशी माहिती लायन्स क्लब चे अध्यक्ष अक्षय गिरमे यांनी दिली.
या पाच दिवसीय उत्सवात विविध क्षेत्रातील मान्यवर भेट देणार असून या उपक्रमासाठी आमदार आशुतोष काळे, सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे, गोदावरी दूध संघाचे राजेश परजणे, समता पतसंस्थेचे चेअरमन काका कोयटे व सम्राट वर्मा यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. तर हा महोत्सव यशस्वीतेसाठी ला संदीप रोहमारे, ला संदीप कोयटे, सचिव ला संदीप राशिनकर, खजिनदार ला अक्षय बोरा, ला. सचिन भडकवाडे तसेच लीनेस अध्यक्ष सोनाली गिरमे, लीनेस सचिव सोनाली जाधव, लीनेस खजिनदार शिला राशिनकर तसेच लिओ अध्यक्ष धीरज कराचीवला, सचिव मानस नागरे, खजिनदार सम्यक फुलफगर, क्रेडाई चे सचिव राहुल भारती, खजिनदार हिरेन पापडेजा यांच्या सह लायन्स, लीनेस, लिओ क्लब तसेच क्रीडाईचे सर्व सदस्य मेहनत घेत आहेत.
या पाच दिवशीय उत्सवाचा कोपरगाव करांनी भरभरून आनंद घ्यावा असे आवाहन लायन्स बिझनेस, प्रॉपर्टी एक्स्पो व सांस्कृतिक महोत्सव २०२६ आयोजन समितीने केले आहे.आयोजित पत्रकार परिषद