आपला जिल्हा

के. जे. सोमैया महाविद्यालयात ‘विद्यार्थी सहभाग परिसंवाद’ संपन्न 

के. जे. सोमैया महाविद्यालयात ‘विद्यार्थी सहभाग परिसंवाद’ संपन्न 

के. जे. सोमैया महाविद्यालयात ‘विद्यार्थी सहभाग परिसंवाद’ संपन्न 

जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि ११ फेब्रुवारी २०२६के.जे.सोमैया (वरिष्ठ) व के.बी. रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालय येथे दि. ९ फेब्रुवारी २०२६ रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, गुणवत्ता सुधार योजनेंतर्गत ‘विद्यार्थी सहभाग परिसंवाद’ संपन्न झाल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय ठाणगे यांनी दिली. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या उद्देशाने आयोजित या परिसंवादासाठी ‘शाश्वत विकास, युवती सुरक्षेमध्ये माझी भूमिका, विकसित भारत माझे स्वप्न- माझा आराखडा, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि मी’ असे विषय ठेवण्यात आलेले होते.

जाहिरात

या परिसंवादात महाविद्यालयातील एकूण २६ संघांनी म्हणजेच १६२ विद्यार्थ्यांनी आपला सक्रिय सहभाग नोंदविला. परिसंवादाच्या उद्घाटन समारंभात  प्राचार्य डॉ. विजय ठाणगे  यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्त्व विकासाबरोबरच यशस्वी होण्याचा मूलमंत्र दिला. मिळालेल्या यश-अपयशाला जबाबदार आपणच असतो, आपण प्राप्त केलेले ज्ञान व आपल्या चांगल्या सवयी ह्या सतत कामाला येत असतात, असेही त्यांनी नमूद केले. परिसंवादाचे प्रास्ताविक करतांना संयोजक डॉ. निता शिंदे म्हणाल्या की, विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेल्या ज्ञानाच्या आधारावर विविध विषयावर त्यांचे विचार आणि कल्पना विस्तृतपणे मांडण्याचे कौशल्य या परिसंवादातून आत्मसात होणार आहे.

जाहिरात

या परिसंवादात विद्यार्थ्यानी निवडलेल्या विषयावर अभ्यासपूर्ण  विचार मांडले. या परिसंवादात टी. वाय. बी. बी. सी. ए.(संघ- के )संघाने प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय क्रमांक एफ वाय बी.सी.एस.( संघ-जी) यांनी तर तृतीय क्रमांक एस.वाय. बी.सी.एस. (संघ -व्ही)संघाने पटकाविला. पुरस्कार प्राप्त संघाना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या संपूर्ण परिसंवादाचे परीक्षण मा. नेहा गुरावे (सॉफ्ट स्किल ट्रेनर) राहाता यांनी केले. उद्घाटन सत्राचे सूत्रसंचालन प्रा. अमोल चिने व प्रा. आदिती देशमुख यांनी केले तर आभार डॉ. एम. बी. खोसे यांनी मानले. ह्या संपूर्ण परिसंवादाचे यशस्वी आयोजन महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले.

जाहिरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे