आपला जिल्हा

एस.एस.जी.एम महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय ई-परिषदेचे आयोजन

एस.एस.जी.एम महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय ई-परिषदेचे आयोजन

एस.एस.जी.एम महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय ई-परिषदेचे आयोजन

जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि १५ फेब्रुवारी २०२६ रयत शिक्षण संस्थेच्या श्री सद्गुरु गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स कॉलेज कोपरगाव येथील मराठी, हिंदी, इंग्लिश  विभाग आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष  यांच्या  संयुक्त विद्यमाने  “AI-Opportunities and Challenges in Literature”  या विषयावर बुधवार, दि.१८ फेब्रुवारी २०२६ रोजी  हायब्रिड-मोडद्वारे (hybrid-mode) आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन  केलेले आहे.

जाहिरात

            सदर ई-परिषदेचे उद्घाटन रयत शिक्षण संस्थेचे व्हा. चेअरमन व महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन  मा. अॅड. भगीरथ शिंदे यांच्या प्रमुख  उपस्थितीत होणार असून परिषदेसाठी मा. श्री. भास्कर हांडे ( संस्थापक,वैश्विक कला पर्यावरण, नेदरलँड (यूएसए) मा. डॉ. जयदीप सारंगी( प्राचार्य, न्यू अलीपूर कॉलेज, कोलकाता, भारत) मा. डॉ. गोपाल नरसन( कुलगुरू, विक्रमशिला हिंदी विद्यापीठ, भागलपूर, भारत) व  डॉ. आनंद कुलकर्णी (प्राचार्य, कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय नारायणगाव) हे मार्गदर्शन करणार आहे. या आंतरराष्ट्रीय ई-परिषदेसाठी संशोधकांकडून लेख मागविण्यात येत आहे.  सदर  संशोधन पेपर ISBN e-book मध्ये  प्रकाशित होणार असून या परिषदेमध्ये अभ्यासकांना संशोधन पेपर सादरीकरणाची संधी मिळणार आहे. संशोधनाचे विषय खालील प्रमाणे आहे. Literature Research and AI,साहित्य अध्यापन आणि कृत्रिम बुद्धिमत्ता, साहित्य, संशोधन, संस्कृति और कृत्रिम बुद्धिमत्ता इ.

जाहिरात

            खालील लिंकवर क्लिक करून परिषदेत  आपला सहभाग नोंदवावा.सहभाग नोंदविण्याची अंतिम दिनांक १८ फेब्रुवारी २०२५ सकाळी ९. ००वाजेपर्यंत (भारतीय प्रमाण वेळेनुसार )

जाहिरात

लिंक – https://forms.gle/oQKj3SV1LBQFtmqm9

पेपर पाठविण्यासाठी मेल आय डी-  मराठी-raosahebdahe@gmail.com

                                               हिंदी-hindideptssgm@gmail.com

                                               इंग्लिश-deptengssgm55@gmail.com

Whats up Group- https://chat.whatsapp.com/K348HKbdPau0yvOZo1CO4q?mode=gi_c

तरी जास्तीत जास्त विषयतज्ञ व  अभ्यासकांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन  महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. (डॉ.) माधव सरोदे यांनी केले आहे. 

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे