आपला जिल्हा

बिझनेस एक्सपो मध्ये  रविवारी सुंदर हस्ताक्षर व कॉमेडी नाटक स्पर्धा

बिझनेस एक्सपो मध्ये  रविवारी सुंदर हस्ताक्षर व कॉमेडी नाटक स्पर्धा
बिझनेस एक्सपो मध्ये  रविवारी सुंदर हस्ताक्षर व कॉमेडी नाटक स्पर्धा

कोपरगाव विजय कापसे दि १४ फेब्रुवारी २०२६लायन्स,लिनेस, लिओ क्लब कोपरगाव व क्रेडाई कोपरगाव प्रायोजित कर्मवीर शंकरराव काळे उद्योग समूह, प्रायोजित संजीवनी ग्रुप ऑफ व सम्राट ग्रुप प्रायोजक असलेले तसेच गोदावरी दूध व समता पतसंस्था सहप्रयोजक असलेले सालाबाद प्रमाणे याही वर्षी कोपरगाव शहरातील महात्मा गांधी प्रदर्शन मध्ये भव्य एक्स्पो २०२६ चे आयोजन गुरुवार दि १२ फेब्रुवारी ते सोमवार दि १६ फेब्रुवारी दरम्यान केले आहे.
 या एक्स्पो मध्ये शालेय विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या अनुषंगाने रविवार दि १५ फेब्रुवारी रोजी भव्य सुंदर हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन केले आहे. भास्कर मॅथस अँड सायन्स अँकेडमी प्रायोजक असलेल्या या सुंदर हस्ताक्षर स्पर्धेत इयत्ता ५ ते ९ वीच्या वर्गातील विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. रविवार दि १५ फेब्रुवारी सकाळी ११ वाजता ही स्पर्धा सुरू होणार आहे तर सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात येणार आहे तर प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या स्पर्धकांस १ हजार १ रुपये, द्वितीय क्रमांक मिळविणाऱ्या स्पर्धकास ७०१ रुपये तर  तृतीय क्रमांक मिळविणाऱ्या स्पर्धकांस ५०१ रुपयांचे रोख स्वरूपात बक्षीस वाटप करण्यात येणार आहे.तर या प्रसंगी  कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन प्रवीण शिंदे, गौतम कुक्कुटपालन कोळपेवाडी चे चेअरमन विजय कुलकर्णी, शरद पवार नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन देवेंन रोहमारे आदी उपस्थित राहणार आहे
 तर संध्याकाळी ६ वाजता तुलसीदास खुबानी ज्वेलर्स प्रायोजित कॉमेडी नाटक स्पर्धा होणार आहे या प्रसंगी प्रसिद्ध कॉमेडी रील स्टार ऋषी हराळ व त्यांच्या संपूर्ण टीमची विशेष उपस्थिती असणार आहे. तसेच याप्रसंगी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे, जिल्हा बँकेच्या माजी संचालिका चैताली काळे, कोपरगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी सुहास जगताप, कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, लायन्सचे प्रांताधिकारी राजेश अग्रवाल, तुलसीदास आर खुबानी ज्वेलर्सचे संचालक तुलसीदास खुबानी आणि परिवार आधी मान्यवरांची उपस्थिती असणार आहे.

जाहिरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे