आपला जिल्हा

डान्स कोपरगाव डान्स’मध्ये संत ज्ञानेश्वर इंग्लिश मिडीअम स्कूलचा द्वितीय क्रमांक

डान्स कोपरगाव डान्स’मध्ये संत ज्ञानेश्वर इंग्लिश मिडीअम स्कूलचा द्वितीय क्रमांक
डान्स कोपरगाव डान्स’मध्ये संत ज्ञानेश्वर इंग्लिश मिडीअम स्कूलचा द्वितीय क्रमांक
जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि १८ फेब्रुवारी २०२६–  लायन्स, लिनेस, लिओ क्लब आणि क्रेडाई कोपरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘एक्स्पो २०२६’ (वर्ष १३ वे) अंतर्गत ‘लिटिल चॅम्प’ या भव्य सांस्कृतिक कार्यक्रमात संत ज्ञानेश्वर इंग्लिश मिडीयम स्कूल, कोपरगाव च्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाची सुरुवात अतिशय सुंदर आणि प्रभावी ‘गणेश वंदनेने झाली. विद्यार्थ्यांच्या शिस्तबद्ध हालचाली, वेशभूषा आणि सादरीकरणाने उपस्थित प्रेक्षक व परीक्षकांना मंत्रमुग्ध केले.

जाहिरात
परिसरातील विविध शाळेच्या सहभागी विद्यार्थ्यांच्या चुरशीच्या स्पर्धेत संत ज्ञानेश्वर स्कूलच्या डान्स ग्रुपने द्वितीय क्रमांक पटकावला. मान्यवरांच्या हस्ते शाळेला सन्मान चिन्ह आणि रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. हे यश स्वीकारताना शाळेचे मुख्याध्यापक सचिन मोरे, शिक्षिका वैष्णवी काळे, सई कापसे, रवी पवार व सर्व विजयी विद्यार्थी उपस्थित होते.

जाहिरात
तर विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल त्यांचे व त्यांचा शिक्षकांचे ‘संत ज्ञानेश्वर विद्या प्रसारक संस्थे’चे अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष  राजेंद्र झावरे व कार्यकारी विश्वस्त  विशाल झावरे यांनी अभिनंदन करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या तर केवळ शिक्षणच नव्हे तर विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी शाळा नेहमीच पुढाकार घेते. अशा मोठ्या व्यासपीठावर विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल पालकांनी देखील शाळेचे विशेष आभार मानले व कौतुक केले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे