आत्मानंद वार्षिक क्रीडा महोत्सव आनंदमय वातावरणात साजरा
आत्मानंद वार्षिक क्रीडा महोत्सव आनंदमय वातावरणात साजरा
जाहिरात
येवला विजय कापसे दि २४ फेब्रुवारी २०२६-विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट कोकमठाण संचलित आत्मा मालिक इंग्लिश मीडियम येवला गुरुकुलाचे अध्यक्ष हनुमंत भोंगळे यांच्या मार्गदर्शन व प्रेरणेतून आत्मानंद वार्षिक क्रीडा महोत्सव २०२६ तालुका क्रीडा संकुल येवला येथे तालुका क्रीडा अधिकारी शिवप्रसाद घोडके तसेच हनुमंत भोंगळे, संत कंकाली बाबा, संत चरणदास महाराज, पुरणगाव गुरुकुलाचे प्राचार्य राजेश पाटील, येवला गुरुकुलाचे प्राचार्य तुषार कापसे यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या आनंदमय वातावरणात संपन्न झाला.
जाहिरात
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून प्रतिमा पूजन करण्यात आले व आत्मा मालिक माऊलींच्या आरतीने व झेंडा फडकवून खेळाविषयीची शपथ घेण्यात आली तर या स्पर्धेत गुरुकुल मधील इयत्ता पहिली ते नववीचे सर्वच विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या खेळांमध्ये सहभाग घेतला यात प्रामुख्याने थाळी फेक (डिस्क थ्रो )( शॉट पुट) गोळा फेक, रनिंग रेस, लेमन स्पून, सॅक रेस, पोटॅटो रेस,कबड्डी,लंगडी आदी खेळांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत उत्कृष्ट खेळ सादर केला.जाहिरात
क्रीडा अधिकारी शिवप्रसाद घोडके यांनी विद्यार्थ्यांना खेळाचे महत्व व उपयोग सांगताना खेळामुळे आपला शारीरिक विकास होतो व शरीर सुदृढ राहते त्यामुळे सर्वांनी किमान एक तास तरी आवडेल तो मैदानी खेळ खेळत आनंदाने जीवन जगावे असा मौखिक सल्ला विद्यार्थ्यांना देत त्यांना शुभेच्छा दिल्या. तर गुरुकुलाचे अध्यक्ष हनुमंत भोंगळे यांनी देखील विद्यार्थ्यांना खेळाविषयी मार्गदर्शन करत शुभेच्छा दिल्या.जाहिरात
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनाली घोडके व मनीषा कुमकर यांनी केले. तर कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडण्यासाठी प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.