आपला जिल्हा

सामाजिक एकोप्यातून ग्रामविकास शक्य:- डॉ. गोकुळदास गायकवाड 

सामाजिक एकोप्यातून ग्रामविकास शक्य:- डॉ. गोकुळदास गायकवाड 

नांदगाव येथे विशेष श्रमसंस्कार शिबिरास सुरुवात

जाहिरात

अहिल्यानगर विजय कापसे दि २४ फेब्रुवारी २०२६साहासी, स्वच्छ मन, स्पष्ट विचार व निडर युवक राष्ट्राच्या भविष्याची निर्मिती करू शकतो. शिक्षणाबरोबरच सोबत आपले कलागुण जोपासायला हवेत, तसेच सामाजिक एकोप्यातून ग्रामविकास साधता येईल असा मूलमंत्र डॉ. गोकुळदास गायकवाड यांनी राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवकांना दिला.

जाहिरात

महात्मा फुले कृषी विद्यापीठ संलग्नित डॉ. विखे पाटील कृषि महाविद्यालय विळद घाट, राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिर नांदगाव (ता.जि. अ.नगर) २२ ते २८ फेब्रुवारी, २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आलेले आहे.

जाहिरात

राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करून या शिबिराचे उद्घाटन नांदगावचे सरपंच श्री. सखाराम सरक, उपसरपंच सौ. मीनाताई तांबे, प्रमुख पाहुणे श्री. गोकुळदास गायकवाड, कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. सोमेश्वर राऊत यांच्या हस्ते झाले.

जाहिरात

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ.सोमेश्वर राऊत यांनी स्वयंसेवकांना गावच्या समस्या जाणून घेऊन, योग्य ते नियोजन करून त्यावर उपाययोजना करण्याचे सांगितले तसेच शिबिरामध्ये गावातील श्रमदान, आधुनिक शेती या संदर्भामध्ये प्रबोधन करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले.

यावेळी  सरपंच सखाराम सरक, ग्रा. सदस्य  नाथभाऊ सरक तसेच  चंद्रकांत पुंड सर यांनी स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले नांदगाव गावचे सरपंच श्री. सखाराम सरक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. हरिभाऊ शिरसाठ, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. किरण दांगडे, नांदगाव गावचे वि.वि.का.स.यो चे चेअरमन  नंदकुमार सोनवणे, उद्योजक  दत्तात्रय पुंड , ग्रा. सदस्य राजाराम पुंड,  नाथाभाऊ सरक,  बाळू वर्पे, प्रगतशील शेतकरी आबा पुंड, मच्छिंद्र पुंड  रमेश सोनवणे, जि.परिषद प्रा.शा.चे मुख्याध्यापक  नरवडे सर,  चंद्रकांत पुंड , ग्रामविकास अधिकारी संगीता डावरे, कृषी सखी योगिता मंचरे हे उपस्थित होते.

या शिबिरास डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनचे संचालक (तंत्र)  प्रा. सुनील कल्हापुरे व महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी चे संचालक, राष्ट्रीय सेवा योजना तथा विद्यार्थी कल्याण अधिकारी प्रा. डॉ. विलास आवरी यांचे मार्गदर्शन लाभले या विशेष श्रमसंस्कार शिबिरामध्ये २५ विद्यार्थी सहभागी आहेत. राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. किरण दांगडे यांनी प्रास्ताविकात नांदगाव येथे सात दिवस राबवण्यात येणाऱ्या उपक्रमाची माहिती दिली तर रा.से.यो सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा.जयश्री राऊत यांनी आभार मानले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे