आपला जिल्हा

एस.एस.जी.एम. कॉलेजमध्ये नेट-सेट तयारी व संशोधन मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न       

एस.एस.जी.एम. कॉलेजमध्ये नेट-सेट तयारी व संशोधन मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न      

एस.एस.जी.एम. कॉलेजमध्ये नेट-सेट तयारी व संशोधन मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न       

जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि २६ फेब्रुवारी २०२६ : श्री सद्गुरु गंगागीर महाराज कॉलेज, कोपरगाव येथील वाणिज्य व व्यवस्थापन विभाग, बीबीए विभाग, करिअर काउन्सेलिंग अँड प्लेसमेंट सेल व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने “क्षेत्रीय संशोधन व संशोधन प्रकल्प तयारी आणि नेट-सेट तयारी”या विषयावरील एकदिवसीय कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली.

जाहिरात

कार्यक्रमात नेट-सेट परीक्षेची तयारी व संशोधन प्रकल्पाबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले. मा. सागर मोरे यांनी परीक्षेचे स्वरूप, अभ्यासाचे नियोजन योग्य मार्गदर्शनाचे महत्त्व, तसेच पेपर १ व पेपर २ ची तयारी कशी करावी याबाबत सविस्तर माहिती दिली. त्यांनी योग्य संदर्भग्रंथ निवड, नियमित सराव आणि अभ्यासातील सातत्य यावर विशेष भर दिला.

जाहिरात

तसेच संशोधन प्रकल्प करताना विषय निवड, संशोधनाची गरज व उद्दिष्टे, माहिती संकलन पद्धती, तसेच प्रकल्प अहवालाचे योग्य लेखन कसे करावे याविषयी उपयुक्त मार्गदर्शन करण्यात आले.

जाहिरात

दुसऱ्या सत्रात प्रा. अर्जुन भगवत यांनी संशोधन पद्धतीचे महत्त्व स्पष्ट करून संशोधन करताना आवश्यक टप्पे, योग्य आराखडा तयार करणे, तसेच प्रकल्प सादरीकरणातील बारकावे याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विविध शंका विचारल्या व त्यांचे समाधानकारक निरसन करण्यात आले.

Oplus_131072

प्राचार्य डॉ. एम. टी. सरोदे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांनी संशोधनवृत्ती जोपासावी, असे आवाहन केले.नेट-सेट परीक्षेत यश मिळवण्यासाठी नियोजनबद्ध अभ्यास आणि सातत्य आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
संशोधन करताना प्रामाणिकपणा, अचूक माहिती संकलन आणि योग्य संदर्भांचा वापर महत्त्वाचा असल्यावर त्यांनी भर दिला. विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहून त्यासाठी कठोर परिश्रम करण्याची तयारी ठेवावी, असेही ते म्हणाले. अशा कार्यशाळांमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो व करिअरला योग्य दिशा मिळते, असे त्यांनी स्पष्ट केले.कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला असून विद्यार्थ्यांसाठी तो अत्यंत मार्गदर्शक व उपयुक्त ठरला. याप्रसंगी सूत्रसंचालन प्रा. प्रतीक्षा संवत्सरकर आणि प्रा. मयुरी देवकर  यांनी केले तर आभार प्रा. दिलीप  भोये   यांनी मानले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे