आपला जिल्हा
अभिवाचक अनिल सोमणी यांना प्रज्ञावंत गौरव पुरस्कार प्रदान

अभिवाचक अनिल सोमणी यांना प्रज्ञावंत गौरव पुरस्कार प्रदान

अभिवाचक अनिल सोमणी यांना प्रज्ञावंत गौरव पुरस्कार प्रदान

संगमनेर विजय कापसे दि २६ फेब्रुवारी २०२६– मा.महसूल व शिक्षण मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या यशोधन कार्यालयात सेवा देणारे निवृत्त नायब तहसीलदार तथा अभिवाचक व साहित्यप्रेमी अनिल सोमणी यांना आनंदोत्सव ट्रस्टच्या वतीने प्रज्ञावंत गौरव पुरस्काराने शानदार कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले.


अनिल सोमनी हे अकोले तालुक्यातील गर्दनी गावचे शेतकरी असून महसूल विभागात कार्यरत झाल्यानंतर संगमनेर तालुक्यात यांनी अनेक वर्ष अत्यंत प्रामाणिकपणे सेवा दिली. सेवानिवृत्तीनंतर लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या यशोधन कार्यालयात ते कार्यरत असून सामाजिक सांस्कृतिक व विविध उपक्रमात यांचा सक्रिय सहभाग असतो.

कोरोना संकट काळानंतर वाचनचळवळ वृद्धिंगत व्हावी याकरता त्यांनी विविध पुस्तकांचे अभिवाचन सुरू केले. विविध 87 पुस्तक व 35 लेखांचे त्यांनी अभिवाचन केले असून youtube सह आकाशवाणीवर त्यांचे अनेक पुस्तकांची अभिवाचन झाले आहे. यापैकी श्यामची आई या अभिवाचनाला राज्यभरातून मोठी पसंती मिळाली. या कामी शिक्षक नेते शांताराम डोंगरे यांनीही मोलाची मदत केली.
नाट्यचळवळ ,साहित्य ,वाचनसंस्कृती वाढवण्यामध्ये त्यांचा मोठा पुढाकार राहिला असून अहिल्यानगर येथील आनंद उत्सव ट्रस्टच्या वतीने त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना प्रज्ञावंत गौरव पुरस्कार देण्यात आला.
यावेळी बोलताना अनिल सोमणी म्हणाले की, जीवनामध्ये अनेकांचे मार्गदर्शन मिळाले. साहित्यसह इतरांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी डॉ.अनिल सहस्रबुद्धे यांच्यासह अनेकांनी प्रेरणा दिली. संगमनेर अकोले ही संत आणि कलावंत यांची आदर करणारी भूमी आहे. या ठिकाणाहून अनेक क्षेत्रात काम करण्याची संधी मिळाल्याने जीवन आनंदी झाले आहे. हा पुरस्कार आपली दिवंगत पत्नी सौ. सीमा सोमणी यांना अर्पण करत असल्याचे ते म्हणाले.
अनिल सोमनी यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात, मा. आमदार डॉ सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, इंद्रजीत भाऊ थोरात, रणजितसिंह देशमुख, डॉ. जयश्रीताई थोरात, सौ दुर्गाताई तांबे, बाबासाहेब ओहोळ,डॉ. संजय मालपणी, डॉ.नितीन भांड ,रामदास तांबडे, प्रा बाबा खरात, जगन्नाथ घुगरकर, किरण कानवडे,नामदेव कहांडळ भास्कर खेमनर, संजय कोल्हे, विजय हिंगे, अनिल देशपांडे, शांताराम डोंगरे प्राचार्य ज्ञानेश्वर गोंटे,अरविंद गाडेकर, सेवानिवृत्त जिल्हा वन अधिकारी शिवाजीराव फटांगरे, अरुण रुपवते, संदीप वाकचौरे, हिरालाल पगडाल, सुरेश खांडगे ,डॉ.उल्हास कुलकर्णी , बाळासाहेब हांडे, अनिरुद्ध उपासनी यांच्यासह संगमनेर साहित्य परिषदेच्या विविध सदस्यांनी अभिनंदन केले आहे.