आपला जिल्हा

संजीवनी इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये सायबर सिक्युरिटी बाबत जागृती

संजीवनी इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये सायबर सिक्युरिटी बाबत जागृती

सोशल मीडियाचा वापर काळजीपूर्वक करा – पो. नि. सागर ढिकले

जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि २८ फेब्रुवारी २०२६: गेल्या वर्षी सायबर गुन्ह्यांच्या माध्यमातून राज्यात बत्तीसशे  कोटी तर देशभरात आठ ते दहा हजार कोटी रूपयांची फसवणुक झाली. सायबर गुन्हेगार ठरावीक कालावधीनंतर गुन्ह्यांची पध्दत बदलतात. हे वास्तव लक्षात घ्या. सोशल मिडीयाचा वापर काळजीपूर्वक करा. आपल्या हातून न कळत घडलेला गून्हा पुढील करिअर मध्ये मोठा अडथळा ठरतो.  हि बाब गांभीर्याने लक्षात घ्या. सतर्क रहा आणि सोशल मिडीयाचा वापर काळजीपूर्वक करा. असा सल्ला सायबर सिक्युरिटीचे पोलीस निरीक्षक सागर ढिकले यांनी संजीवनी इंजिनिअरींग काॅलेजच्या विद्यार्थ्यांना दिला.

जाहिरात

    संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या ‘विद्यार्थी उपक्रम परीषदेच्या वतीने  पहिल्या वर्षातील विद्यार्थ्यांसाठी  ‘सायबर सिक्युरीटी’ या विषयावर ते बोलत होते.  अध्यक्षस्थानी संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे होते. सायबर सिक्युरीटी विभागाचे  अशोक करंडे  व अभिजीत अरकल, इंजिनिअरींग कॉलेजचे डायरेक्टर डॉ. आर. ए. कापगते, विभाग प्रमुख डॉ. दिपेश  परदेशी  व विद्यार्थी उपक्रम परीषदेचे डीन डॉ. मकरंद कुलकर्णी आदि उपस्थित होते.

जाहिरात

     ढिकले पुढे म्हणाले की इंटरनेट, सायबर फसवणूकीत लोक,  लाज, भीती किंवा सामाजिक दबावामुळे गप्प रहातात.  अनोळखी लिंक पासून दूर रहावे. लोन स्कॅम, फिशिंग, बनावट चलन, ओटीपी फ्रॉड, फेक अॅप स्कॅम, ई-मेल स्कॅम, गुंतवणूक अॅप फसवणूक, नोकरीच्या आमिषाने फसवणूक, साधर्म्य असलेल्या बनावट वेबसाईट, कस्टमर केअर फ्रॉड, केवायसी फ्रॉड, ऑनलाईन सेक्सॉटॉर्शन, मॅट्रिमोनियल फ्रॉड, क्यूआर कोड फसवणूक, रॅन्समवेअर हल्ले, ई-कॉमर्स फसवणूक, रिमोट अॅक्सेस फसवणूक, सायबर रॉकिंग, ‘डिजिटल अरेस्ट’ची बनावट भीती, मनी ट्रान्सफर बाय मिस्टेक आणि टास्क कम्प्लिशन फ्रॉड अशा विविध प्रकारे फसवणुक होते. ‘डिजिटल अरेस्ट’ हा प्रकार अस्तित्वात नाही.

जाहिरात

सायबर गुन्ह्यांचे वाढते प्रमाण ही  चिंतेची बाब आहे.  त्यात  तरुण पिढी अडकत चालली. डिजिटल युगात वावरताना योग्य ती खबरदारी कशी घ्यावी. सायबर सापळ्यांपासून  दूर कसे राहावे याबाबत सायबर सेल चे पोलीस निरीक्षक सागर ढिकले यांनी केलेले मार्गदर्शन विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरेल. आता विद्यार्थ्यांनी देखील याबाबत जनजागृती करावी.

अमित कोल्हे ( मॅनेजिंग ट्रस्टी, संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स) 

 

 

 

 

 

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे