आपला जिल्हा

अहिल्यानगर जिल्ह्यातील 753 ग्रामपंचायत प्रशासक सरपंचाबाबत छापील बातमीशी काहीही संबंध नाही

अहिल्यानगर जिल्ह्यातील 753 ग्रामपंचायत प्रशासक सरपंचाबाबत छापील बातमीशी काहीही संबंध नाही

वृत्तपत्रातून माझ्या नावाने खोटी बातमी प्रसिद्ध
 – विजय रामनाथ रहाणे

जाहिरात

संगमनेर विजय कापसे दि २८ फेब्रुवारी २०२६
अहिल्यानगर जिल्ह्यातील 753 ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आलेले सरपंच व त्याबाबतची प्रशासकीय समिती याबाबत मला कोणत्याही प्रकारची माहिती नसून माझ्या नावाने सार्वमत या  दैनिकात दिशाभूल करणारे खोटे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले त्याच्याशी माझा कोणत्याही प्रकारचा संबंध नसल्याची माहिती चंदनापुरी येथील माजी सरपंच तथा सहकारमहर्षी भाऊसाहेब   थोरात सह. साखर कारखान्याचे विद्यमान संचालक विजय रामनाथ राहणे यांनी दिली आहे.

जाहिरात

           याबाबत माहिती देताना राहणे  म्हणाले की, दिनांक 28 फेब्रुवारी 2026 रोजी सार्वमत या वृत्तपत्रात जिल्ह्यातील प्रशासक सरपंचाचे आर्थिक अधिकार तूर्त गोठवले अशा शीर्षकाचे  वृत्त प्रसिद्ध झाले आहे. या बातमीत अहिल्यानगर जिल्ह्यातील 753 ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या सरपंच व प्रशासकीय समिती सदस्यांना आर्थिक निर्णय घेण्यास औरंगाबाद खंडपीठाने पुढील आदेशापर्यंत मनाई केली आहे. व याबाबत पुढील सुनावणी 28 मार्चला ठेवण्यात आली असून संगमनेर तालुक्यातील चंदनापुर येथील विजय राहणे यांनी याबाबत न्यायालयात धाव घेतली होती . अशा आशयाची चुकीची बातमी प्रकाशित करण्यात आली आहे.

जाहिरात

           वास्तविक पाहता अहिल्या नगर जिल्ह्यातील 753 ग्रामपंचायतीवरील प्रशासक सरपंच, प्रशासकीय समिती याबाबत आपल्याला कोणत्याही प्रकारची माहिती नसून छापून आलेल्या बातमीची आपला कोणत्याही प्रकारचा संबंध नाही व याची साधी पूर्वकल्पनाही आपल्याला नाही. माझ्या नावाने कुणीतरी चुकीची किंवा खोटी बातमी प्रसिद्ध केली आहे. ही अत्यंत चुकीची बाब असून यामुळे जिल्ह्यात व तालुक्यात सरपंच व प्रशासकीय समितीत माझ्या बाबत गोंधळाचे  वातावरण निर्माण झाले आहे. वास्तविक पाहता तालुक्यातील ग्रामपंचायतींवर प्रशासक म्हणून नेमण्यात आलेल्या सरपंचांसोबत आपण असून चुकीच्या पद्धतीने ही बातमी देण्यात आली आहे. यामुळे आपल्याला विनाकारण मनस्ताप झाला असून सदर वृत्तपत्रांनी तातडीने खुलासा करून झालेल्या  चुकीची दुरुस्ती करावी अशी मागणी ही त्यांनी यावेळी केली आहे.

जाहिरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे