आपला जिल्हा

कर्मवीर शंकरराव काळे कारखान्यात ५५ वा राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह साजरा

कर्मवीर शंकरराव काळे कारखान्यात ५५ वा राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह साजरा

कर्मवीर शंकरराव काळे कारखान्यात ५५ वा राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह साजरा

जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि ११ मार्च २०२६ :- ५५ व्या राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहाचे औचीत्य साधत गुरुवार (दि.०५) रोजी कोपरगाव तालुक्यातील कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्यात ५५ वा राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कारखान्यातील कर्मचाऱ्यांमध्ये सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

जाहिरात

शेतकऱ्यांचे हित जोपासणाऱ्या कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व्यवस्थापनाकडून कारखाना व उद्योग समुहाचे मार्गदर्शक माजी आमदार अशोकराव काळे व कारखान्याचे चेअरमन आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली उद्योग समुहाचे महत्वाचे घटक असणाऱ्या कारखाना कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची योग्य प्रकारे काळजी घेतली जाते व त्याबाबत वेळोवेळी कर्मचाऱ्यांना योग्य मार्गदर्शनही केले जाते.

जाहिरात

यावेळी कारखान्याचे चिफ इंजिनिअर कम फॅक्टरी मॅनेजर निवृत्ती गांगुर्डे यांनी कामगारांना सुरक्षिततेची शपथ दिली. कारखाना कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करतांना ते म्हणाले कीसुरक्षितेच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करुन आपण व आपला कारखाना सुरक्षित कसा राहिल यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. निषकाळजीपणा आणि बेजाबदार पणाने केलेले काम स्वतःबरोबरच इतरांनाही हानिकारक ठरू शकते याची जाणीव ठेवावी. कारखान्यात काम करतांना आपल्याला कोणत्याही प्रकारची इजा होणार नाही याची काळजी घेवून सर्व  कर्मचाऱ्यांनी आवश्यक त्या सुरक्षा साधनाचा काटेकोरपणाने वापर करुन काळजी घेण्याचे सांगितले.

जाहिरात

यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक सोमनाथ बोरनारेजनरल मॅनेजर सुनिल कोल्हेआसवनी विभागाचे जनरल मॅनेजर ज्ञानेश्वर आभाळेप्रोडक्शन मॅनेजर सुर्यकांत ताकवणेलेबर ऑफिसर दिपक निंबाळकरसुरक्षा अधिकारी राजेंद्र धुमाळ व सेफ्टी ऑफिसर सुरेंद्र हापसे यांच्यासह उपखाते प्रमुख, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे