आपला जिल्हा

एसएसजीएममध्ये एक्स्पो आणि गुणवंतांचा गौरव

एसएसजीएममध्ये एक्स्पो आणि गुणवंतांचा गौरव

एसएसजीएममध्ये एक्स्पो आणि गुणवंतांचा गौरव

जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि ११ मार्च २०२६ : रयत शिक्षण संस्थेच्या श्री सद्गुरु गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स महाविद्यालय, कोपरगाव, येथे १३ मार्च रोजी ‘SSGM EXPO–2026’ तर १४ मार्च रोजी वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात आला आहे.

जाहिरात

  शुक्रवार दि.१३ मार्च रोजी होणाऱ्या एक्स्पोचे उद्घाटन महाविद्यालय विकास समितीचे सदस्य मा.श्री.विवेकभैया कोल्हे यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.या एक्स्पोमध्ये विद्यार्थ्यांचे संशोधन प्रकल्प, कौशल्य विकास अभ्यासक्रम आराखडा व नवोपक्रमांचे सादरीकरण करण्यात येणार आहे. तर शनिवार दि.१४ मार्च रोजी पारितोषिक वितरण समारंभात शैक्षणिक, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या  विद्यार्थी व प्राध्यापकांचा  सन्मान करण्यात येणार आहे.

जाहिरात

      १४ मार्च रोजी पारितोषिक वितरण समारंभाचे प्रमुख पाहुणे सुप्रसिद्ध कवी मा.श्री.इंद्रजीत भालेराव यांच्या प्रमुख उपस्थितीत व रयत शिक्षण संस्थेचे व्हा. चेअरमन व महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन मा. ॲड. भगीरथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होत आहे.

जाहिरात

      या कार्यक्रमांचे आयोजन प्राचार्य डॉ. माधव सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले असून विद्यार्थी, पालक व नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे