आपला जिल्हा

कोपरगाव राष्ट्रवादी काँग्रेसकडून मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा

कोपरगाव राष्ट्रवादी काँग्रेसकडून मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा

कोपरगाव राष्ट्रवादी काँग्रेसकडून मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा

जाहिरात

Kopargaon vijay kapse दि २१ मार्च २०२६कोपरगाव शहरात दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी ‘रमजान ईद’चा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सर्व मुस्लीम बांधवांनी ईदगाह मैदान व अक्सा मस्जिद येथे सामुदायिक नमाज पठण केले. याप्रसंगी कोपरगाव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी आमदार आशुतोष काळे यांच्या वतीने सर्व मुस्लीम बांधवाना ‘रमजान ईद’ च्या शुभेच्छा दिल्या.

जाहिरात

पवित्र रमजान महिनाभराच्या उपवासानंतर आज कोपरगाव शहरात रमजान ईदचा सण अत्यंत उत्साहात आणि आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला. ईदनिमित्त नमाज पठण करण्यासाठी ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांचा जनसागर उसळला होता. नमाज संपन्न झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी उपस्थित राहून सर्व मुस्लिम बांधवांची गळाभेट घेत त्यांना आमदार आशुतोष काळे यांच्या वतीने ईदच्या शुभेच्छा दिल्या.  सामाजिक बांधिलकी जपतांना राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी या सणाचा आनंद मुस्लिम बांधवांसोबत द्विगुणित केला 

जाहिरात

याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आजी-माजी नगरसेवक, विविध सेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने  उपस्थित होते.

जाहिरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे