आपला जिल्हा

प्रगतशील शेतकरी मधुकर उगले यांची मुख्यमंत्री सहाय्यता निधीस दहा हजार मदत

प्रगतशील शेतकरी मधुकर उगले यांची मुख्यमंत्री सहाय्यता निधीस दहा हजार मदत

प्रगतशील शेतकरी मधुकर उगले यांची मुख्यमंत्री सहाय्यता निधीस दहा हजार मदत

कोपरगाव विजय कापसे दि १८ ऑक्टोबर २०२५राज्यातील विविध भागांमध्ये नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी वर्गावर मोठे संकट कोसळले आहे. अनेक ठिकाणी पिकांचे नुकसान, जनावरांचे मृत्यू तसेच घरांचे मोठ्या प्रमाणावर झालेले नुकसान पाहता समाजातील सर्व स्तरातून मदतीचा हात पुढे येत आहे.

जाहिरात

अशाच पार्श्वभूमीवर कोपरगाव तालुक्यातील मुर्शतपूर गावचे प्रगतशील शेतकरी श्री. मधुकर उगले यांनी आपल्या सामाजिक जाणिवेचा आणि दायित्वाचा उत्तम आदर्श ठेवत मुख्यमंत्री सहाय्यता निधीस दहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली आहे. नैसर्गिक आपत्तीसमयी शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठीच मदतीचा हात पुढे करावा, ही त्यामागची भावना त्यांनी व्यक्त केली.

जाहिरात

श्री. उगले हे आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा अवलंब करून शेतीत नवनवीन प्रयोग करणारे, तसेच इतर शेतकऱ्यांना प्रेरणा देणारे म्हणून ओळखले जातात. त्यांच्या या सामाजिक योगदानामुळे स्थानिक ग्रामस्थ, सामाजिक संस्था आणि कृषी क्षेत्रातील व्यक्तींनी त्यांचे कौतुक केले आहे.

जाहिरात

राज्य सरकारनेही नागरिकांना अशा प्रकारे मदतीचा हात देण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन केले असून,  मधुकर उगले यांनी दिलेली ही देणगी समाजातील सजग नागरिक म्हणून त्यांच्या संवेदनशीलतेचे प्रतीक ठरली आहे. त्यांच्या या योगदानातून इतर शेतकऱ्यांनीही प्रेरणा घेऊन संकटग्रस्त बांधवांसाठी सहकार्य करावे, असे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे.

जाहिरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे