Kopargaon vijay kapse दि २४ मार्च २०२६–सहकार महर्षी माजी मंत्री स्वर्गीय शंकरराव कोल्हे साहेब यांच्या ९७ जयंती निमित्त संबंध तालुका भर वेगवेगळ्या समाजपयोगी उपक्रम राबवत प्रेरणा दिवस म्हणून साजरा केला जात आहे त्याच अनुषंगाने कोपरगाव तालुक्यातील शिंगणापूर गावचे माजी सरपंच तथा सामाजिक कार्यकर्ते भीमराव संवत्सरकर यांनी शिंगणापूर गावातील जिल्हापरिषद शाळा सहजानंदनगर, रेल्वे स्टेशन शिंगणापूर गावठाण यांच्या ६०० हुन अधिक विद्यार्थ्यांना उच्च प्रतीची पिण्याच्या पाण्याची बॉटल देऊन स्व शंकरराव कोल्हे यांना अभिवादन केले.
जाहिरात
या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते तथा माजी सरपंच भीमराव संवत्सरकर, सरपंच डॉ. विजय काळे, जेष्ठ नेते यादवराव संवत्सरकर, राजेंद्र लोणारी, लक्ष्मीकांत संवत्सरकर प्रमोद संवत्सरकर,संजय तुळसकर, सुनील भोसले, उपसरपंच शाम संवत्सरकर, तंटामुक्ती समिती अध्यक्ष दत्तात्रय संवत्सरकर, ग्रामविकास अधिकारी अविनाश पगारे, शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक आदींसह शिक्षणप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.जाहिरातजाहिरात