प्रेरणादिनानिमित्त अष्टविनायक प्रतिष्ठानतर्फे अभिवादन कार्यक्रम उत्साहात
प्रेरणादिनानिमित्त अष्टविनायक प्रतिष्ठानतर्फे अभिवादन कार्यक्रम उत्साहात
जाहिरात
Kopargaon vijay kapse दि २४ मार्च २०२६–माजी मंत्री स्व. शंकररावजी कोल्हे यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या करण्यात येणाऱ्या प्रेरणा दिनाचे औचित्य साधून अष्टविनायक प्रतिष्ठानच्या वतीने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सामाजिक बांधिलकी, सेवा भाव आणि विकासाच्या वाटचालीत मार्गदर्शक ठरलेल्या शंकररावजी कोल्हे यांच्या कार्याला उजाळा देण्यात आला.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते शंकररावजी कोल्हे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. आपल्या मनोगतात वक्त्यांनी शंकररावजी कोल्हे यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या दूरदृष्टी, नेतृत्वगुण आणि समाजसेवेच्या भावनेचा उल्लेख केला. सेवा हाच धर्म या तत्वावर त्यांनी उभारलेले कार्य आजही अनेकांना प्रेरणा देणारे आहे, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.जाहिरात
कार्यक्रमाचे आयोजन सुयोग्य पद्धतीने करण्यात आले असून उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत प्रेरणादिन साजरा केला. समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी अशा प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांची आठवण ठेवणे आवश्यक असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.