प्रेरणादिनानिमित्त अष्टविनायक प्रतिष्ठानतर्फे अभिवादन कार्यक्रम उत्साहात

प्रेरणादिनानिमित्त अष्टविनायक प्रतिष्ठानतर्फे अभिवादन कार्यक्रम उत्साहात
प्रेरणादिनानिमित्त अष्टविनायक प्रतिष्ठानतर्फे अभिवादन कार्यक्रम उत्साहात

Kopargaon vijay kapse दि २५ मार्च २०२६– माजी मंत्री स्व. शंकररावजी कोल्हे यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या करण्यात येणाऱ्या प्रेरणा दिनाचे औचित्य साधून अष्टविनायक प्रतिष्ठानच्या वतीने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सामाजिक बांधिलकी, सेवा भाव आणि विकासाच्या वाटचालीत मार्गदर्शक ठरलेल्या शंकररावजी कोल्हे यांच्या कार्याला उजाळा देण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे उपस्थित होते. यावेळी नगराध्यक्ष पराग संधान, माजी नगराध्यक्ष संजय सातभाई, दिलीप दारुणकर, रवी अण्णा पाठक, राजेंद्र सोनवणे,बबलुशेठ वाणी, दत्तोबा सावंत, संतोष गंगवाल, डी.आर. काले, योगेश बागुल,विजय आढाव, अतुलशेठ काले, प्रदीप नवले, नसीरभाई सय्यद, सनी वाघ, कैलास मंजुळ कलविंदर दडियल, सुनील कुंढारे, बाळासाहेब सोनटक्के, प्रसाद आढाव, चंद्रकांत वाघमारे, संतोष शेजवळ, प्रमोद नरोडे, संतोष चवंडके फकीर मोहम्मद पैलवान, विक्रमादित्य सातभाई, बाळासाहेब नरोडे, बबलू वाणी, बापू पवार, संजय जगदाळे, योगेश जगदाळे, रावसाहेब साठे, संतोष शिंदे, सलीम पठाण, संतोष साबळे, दत्तू पगारे, बाजीराव शिंदे सर, शरद त्रिभुवन, सतीश रानोडे, गोपी गायकवाड, जयप्रकाश आव्हाड, रवी लचुरे, सोमनाथ म्हस्के, रंजन जाधव,राजेंद्र डागा, राजेंद्र गंगुले, शैलेश ठक्कर, गणेश मोरे, सागर जाधव, रोहिदास पाखरे, अहमदभाई बेकरीवाले, नसीरभाई, किरण आव्हाड, अशोक लकारे, लियाकत सय्यद,उमेश धुमाळ, सोमनाथ ताकवले, सोपान चिने, मुक्तार पठाण, साई नरोडे, दिलीप आंबोरे, ऋषिकेश गायकवाड, तानाजी जाधव, पंढरीनाथ वक्ते तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते शंकररावजी कोल्हे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. आपल्या मनोगतात वक्त्यांनी शंकररावजी कोल्हे यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या दूरदृष्टी, नेतृत्वगुण आणि समाजसेवेच्या भावनेचा उल्लेख केला. सेवा हाच धर्म या तत्वावर त्यांनी उभारलेले कार्य आजही अनेकांना प्रेरणा देणारे आहे, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

कार्यक्रमाचे आयोजन सुयोग्य पद्धतीने करण्यात आले असून उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत प्रेरणादिन साजरा केला. समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी अशा प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांची आठवण ठेवणे आवश्यक असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.



