आपला जिल्हा

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्यात प्रेरणादिनानिमीत्त स्वच्छता अभियान

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्यात प्रेरणादिनानिमीत्त स्वच्छता अभियान
सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्यात प्रेरणादिनानिमीत्त स्वच्छता अभियान
जाहिरात

Kopargaon vijay kapse दि २५ मार्च २०२६- माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे हे स्वतःच वक्तशीर होते, त्यांना सातत्यांने नाविन्यपुर्ण गोष्टींचा ध्यास होता, साखर कारखानदारीत प्रगत तंत्रज्ञानावर ते भर देत, स्वयंशिस्त, स्वच्छता, टापटिपपणा, नीटनेटकेपणा हा त्यांच्या जीवनांतील अविभाज्य भाग होता असे प्रतिपादन साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे यांनी केले. सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यात त्यांच्या जयंती प्रेरणादिनानिमीत्त मंगळवारी २४ मार्च रोजी स्वच्छता अभियान व वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यांत आला त्याप्रसंगी ते बोलत होते.

जाहिरात
          प्रारंभी माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यांत आले. तांत्रीक सल्लागार श्री. सिमांचल पांडा याप्रसंगी बोलतांना म्हणाले की, माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी सात दशकात या परिसरात साखर कारखानदारीतून उद्योग व्यवसायाची बाग फुलविली त्याची फळे तुम्ही आम्ही चाखत आहोत, येणा-या पुढच्या पिढयांसाठी त्यात वाढ करून त्याचा आस्वाद अधिक मधुर कसा होईल ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे.

जाहिरात
             श्री. शिवाजीराव दिवटे पुढे म्हणाले की, संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे व कारखान्याचे युवाअध्यक्ष विवेक भैय्या कोल्हे यांनी माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांची प्रेरणा घेत साखर कारखानदारीची घौडदौड यशस्वीरित्या सुरू ठेवत देशात सर्वप्रथम बायो सीएनजी, पोटॅश ग्रॅन्युएल खत निर्माती, उसाच्या रसापासुन थेट इथेनॉल, बायोगॅस, सहवीज, विविध रासायनिक उपपदार्थ निर्मातीत अमुलाग्र बदल करत संजीवनीचे वेगळेपण जपले आहे. स्व. शंकरराव कोल्हे यांच्या सामाजिक, सांस्कृतीक, शैक्षणिक, सहकार, शेती, शिक्षण व सिंचन कामाची अनुभूती संपुर्ण महाराष्ट्र राज्याला ज्ञात असुन राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ, राज्य सहकारी साखर संघ, वसंतदादा शुगर इन्स्टीटयुट, नॅशनल हेवी इंजिनियरींग या संस्थेच्या माध्यमातुन साखर उद्योगातील प्रत्येक स्थित्यंतरातील कामाचा देश विदेशातही ठसा उमटलेला आहे. त्यांच्या पुण्यतिथी ते जयंतीनिमीत्त प्रेरणादिन सप्ताह घेवुन त्यांच्या कार्याला उजाळा देण्याचा प्रयत्न असल्याचे ते शेवटी म्हणांले.

जाहिरात
          याप्रसंगी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर परजणे, संचालक, विविध संस्थाचे पदाधिकारी, सर्व खाते प्रमुख, उपखातेप्रमुख, कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते. सुत्रसंचलन एच. आर. मॅनेजर विशाल वाजपेयी, कामगार कल्याण अधिकारी एस. सी. चिने यांनी केले तर भास्करराव बेलोटे यांनी आभार मानले.

माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या जयंती निमीत्त सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यात प्रेरणादिनानिमीत्त स्वच्छता अभियान व वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यांत आला

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे