आपला जिल्हा

एक तास गोदावरी स्वच्छतेसाठी कोपरगावकरांचा उत्स्फूर्त

एक तास गोदावरी स्वच्छतेसाठी कोपरगावकरांचा उत्स्फूर्त
सिनेअभिनेते चिन्मय उदगीरकर यांची विशेष उपस्थिती
जाहिरात

Kopargaon vijay kapse दि २५ मार्च २०२६अनेक तज्ञांच्या मते भविष्यातील तिसरे महायुद्ध हे फक्त नैसर्गिक साधन संपत्ती वरूनच होणार असून यात पाणी हा महत्त्वाचा घटक असणार आहे त्यामुळे प्रत्येक देशाने पाण्याचे जतन तसेच पाणी वाहून नेणाऱ्या स्त्रोतांची स्वच्छता करणे ही काळाची गरज होऊन बसली आहे आणि यासाठी कोपरगाव शहरातील गोदामाई प्रतिष्ठान ट्रस्ट चे संस्थापक अध्यक्ष आदिनाथ ढाकणे व त्यांची संपूर्ण टीम कोपरगाव शहरातून वाहणाऱ्या पवित्र अशा गोदावरी नदीची ३६० आठवड्यापासून निरंतरपणे स्वच्छता करत आहे. आज बुधवार दिनांक २५ मार्च रोजी त्यांचा या स्वच्छता मोहिमेचा ३६१ वा आठवडा असल्याने या मोहिमेत कोपरगाव शहरातील अनेक मान्यवरांनी सहभागी होत एक तास गोदावरी नदी स्वच्छतेसाठी आपल्या उज्वल भविष्यासाठी ही मोहीम राबवत एक अनोखा संदेश दिला आहे.

जाहिरात
या प्रसंगी प्रसिद्ध सिने अभिनेते चिन्मय उदगीरकर, कोपरगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी सुहास जगताप, कोपरगाव शहर पोलीस उपनिरीक्षक संदीप सोने, दीपक रोठे, सोमय्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विजय ठाणगे, कोपरगाव नगरपालिकेचे नगरसेवक बाळासाहेब रुईकर, रवींद्र कथले, व्यापारी महासंघाचे सुधीर डागा, भाऊसाहेब भाबड, विजय सांगळे, गोरे सर, कोपरगाव तालुका विद्यार्थी सहाय्यक समितीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. हिरालाल महानुभव, सामाजिक कार्यकर्ते सचिन परदेशी, प्रसाद पर्हे, विशाल राऊत, शहरातील पर्यावरण प्रेमी नागरिक तसेच सोमैय्या महाविद्यालयाचे विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, नामदेव परजणे पाटील लॉ कॉलेजचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी तसेच गोदामाई ट्रस्टचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात
याप्रसंगी सिने अभिनेते चिन्मय उदगीरकर,व्यापारी महासंघाचे सुधीर डागा, मुख्याधिकारी सुहास जगताप, पोलीस उपनिरीक्षक संदीप सोने आदींनी आपले मनोगत व्यक्त करत ३६० आठवड्यापासून गोदावरी नदीची स्वच्छता करत असलेल्या गोदामाई ट्रस्टचे आदिनाथ ढाकणे व त्यांच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा दिल्या.

जाहिरात
तर याप्रसंगी व्यापारी महासंघाचे सुधीर डागा यांनी नदीपात्रात कोणी कचरा टाकू नये याकरीता सुरक्षेचा उपाय म्हणून आवश्यक ते सीसीटीव्ही कॅमेरे नदी पुलावर बसवण्यासाठी वैयक्तिकरित्या नगरपालिका प्रशासनाला देणार असल्याचे सांगितले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे