आपला जिल्हा

डॉ. साहिल माळींच्या पुढाकाराने कोपरगावात, आय. सी. यु. नंतरची रुग्णसेवा सुरू

डॉ. साहिल माळींच्या पुढाकाराने कोपरगावात, आय. सी. यु. नंतरची रुग्णसेवा सुरू
डॉ. साहिल माळींच्या पुढाकाराने कोपरगावात, आय. सी. यु. नंतरची रुग्णसेवा सुरू
जाहिरात

Kopargaon vijay kapse दि २५ मार्च २०२६-कोपरगाव शहरातील सुप्रसिद्ध सर्जन डॉक्टर राजेश माळी यांच्या साई पॉलीक्लिनिकमध्ये डॉ. माळी यांचे सुपुत्र डॉ. साहिल माळी यांनी अमेरिकेत शिक्षण घेऊन कोपरगावकरांसाठी अतिदक्षता नंतरची अत्याधुनिक रुग्णसेवा उपलब्ध करून दिली आहे. डॉ. माळी हॉस्पिटलचे “पॅलिएटिव्ह केयर अँड पेनयुनिट” हा कोपरगावच्या वैद्यकीय क्षेत्रातील प्रगतीचा महत्त्वाचा टप्पा असल्याचे मत सुप्रसिद्ध हृदयरोगतज्ञ डॉ. डी. एस. मुळे यांनी व्यक्त केले. अतिदक्षता विभागात दाखल केलेल्या रुग्णांना विशेष काळजी आणि वेदनाशामक उपचारांची आवश्यकता असते. ही गरज ओळखून डॉ. माळी हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक उपकरणे व सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे रुग्णांना आता पुढील उपचारांसाठी पुणे, मुंबई सारख्या मोठ्या शहरांमध्ये जाण्याची आवश्यकता राहणार नाही.

जाहिरात
डॉ. साहिल राजेश माळी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षित वैद्यकीय पथकाद्वारे अत्यवस्थ व गंभीर आजारांची निगा राखली जाणार आहे. आय सी यू मध्ये अत्यवस्थ रुग्णांची वेदना व त्रास कमी करण्यासाठी परदेशी तंत्रज्ञानाने उपचार केले जाणार आहेत. यामध्ये अत्याधुनिक मॉनिटरिंग सिस्टीम, आवश्यक वैद्यकीय उपकरणे आणि तत्पर सेवा यांचा समावेश आहे. या सुविधेमुळे कोपरगाव व परिसरातील रुग्णांना वेळेवर आणि दर्जेदार उपचार स्थानिक पातळीवरच मिळणार असून यामुळे वेळ, खर्च आणि त्रास यांची मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे.

जाहिरात

डॉ. साहिल राजेश माळी यांनी भारतात एमबीबीएस ची डिग्री घेऊन अमेरिकेत फेलोशिप इन पॅलीएटिव्ह मेडिसिन अँड पॅलीएटिव्ह केअर फिजिशयन ची डिग्री घेतली आहे. साई पॉलीक्लिनिकचा हा उपक्रम आरोग्य सेवेत एक महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात असून नागरिकांकडून या सुविधेचे स्वागत केले जात आहे.

जाहिरात

याप्रसंगी सुप्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉ. अमोल अजमेरे, सुप्रसिद्ध कान नाक घसा तज्ञ डॉ. रवींद्र कुलकर्णी, सुप्रसिद्ध आयुर्वेदतज्ञ डॉ. तुषार गलंडे,  सुप्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ डॉ. योगेश बनकर, सुप्रसिद्ध रेडियोलॉजिस्ट डॉ. शिरीष मुळे व डॉ. साहिल राजेश माळी यांच्या मातोश्री सौ. सुवर्णा राजेश माळी, आजी श्रीमती अरुणा माळी, डॉ. भास्कर, डॉ. बंडू शिंदे यांचे सह अनेक मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे