आपला जिल्हा

अमृतवाहिनी पॉलिटेक्निक मध्ये अमृतफेस्ट 2K26 अंतर्गत प्रोजेक्ट स्पर्धा

अमृतवाहिनी पॉलिटेक्निक मध्ये अमृतफेस्ट 2K26 अंतर्गत प्रोजेक्ट स्पर्धा
अमृतवाहिनी पॉलिटेक्निक मध्ये अमृतफेस्ट 2K26 अंतर्गत प्रोजेक्ट स्पर्धा
जाहिरात

Sangmner vijay kapse दि २५ मार्च २०२६ – माजी शिक्षण मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना उच्च गुणवत्ता पूर्ण शिक्षणाबरोबर संशोधन वृत्तीला प्रोत्साहन देण्याकरता अमृतवाहिनी पॉलिटेक्निक मध्ये अमृतफेस्ट 2K26 प्रोजेक्ट स्पर्धा संपन्न झाली असून यामध्ये 261 विद्यार्थ्यांनी आपले नाविन्यपूर्ण प्रोजेक्ट सादर करून प्रभावी कल्पनाशक्तीला चालणा दिली.

जाहिरात
अमृतवाहिनी पॉलिटेक्निक मध्ये अहिल्यानगर, नाशिक , छत्रपती संभाजीनगर ,पुणे आणि मुंबई जिल्ह्यातील अमृत फेस्ट 2K26 हे प्रोजेक्ट प्रदर्शन झाले. या प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी संस्थेच्या कार्यकारी विश्वस्त सौ शरयूताई देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, अकॅडमी डायरेक्टर डॉ. जे बी गुरव, प्राचार्य प्रा व्ही बी धुमाळ, उपप्राचार्य जी.बी काळे, डॉ मनोज शिरभाते, डॉ मच्छिंद्र चव्हाण व सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.

जाहिरात

यावेळी बोलताना सौ शरयू ताई देशमुख म्हणाल्या की, येणारा  काळ हा संगणकाबरोबरच एआय प्रणालीचा आहे. या नवीन काळाबरोबर विद्यार्थ्यांना नवीन ज्ञानाची माहिती होणे गरजेचे आहे.ए आय तंत्रज्ञानाचा इतर विभागांमधून होणारा उपयोग त्यातून निर्माण होणाऱ्या नवीन संधी याबाबत माहिती घेणे अत्यंत गरजेचे आहे. या प्रोजेक्ट प्रदर्शनामुळे अनेक विद्यार्थ्यांना आपल्या कल्पनाशक्ती मधून संशोधनाला चालना मिळाली असल्याच्या त्या म्हणाल्या.

जाहिरात

तर डॉ.जे बी गुरव म्हणाले की, मा शिक्षण मंत्री बाळासाहेब थोरात , माजी आमदार डॉ सुधीर तांबे व सौ शरयू ताई देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अमृतवाहिनी संस्था ही गुणवत्ता पूर्ण वाटचाल करत आहे.

      या प्रदर्शनांमधून मेकॅनिकल, मेक्याट्रॉनिक ,सिविल ,इलेक्ट्रॉनिक्स अँड टेली कम्युनिकेशन ,कॉम्प्युटर, आयटी, शाखांमधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. स्पर्धेमध्ये ऑटोमेशन, रोबोटिक्स, नवकरणीय ऊर्जा ,स्ट्रक्चरल डिझाईन तसेच सॉफ्टवेअर आणि ॲप डेव्हलपमेंट यासारख्या विविध आधुनिक तांत्रिक संकल्पना वर आधारित प्रकल्प सादर झाले.

      विशेषतः आर्टिफिशियल इंटेलिजन्स आधारित प्रकल्पांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले फेस रिकग्रेशन, स्मार्ट सर्विलन्स, व्हाईस कंट्रोल सिस्टीम आणि हेल्थ मॉनिटरिंग यासारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर विद्यार्थ्यांनी अत्यंत सर्जनशील पणे केला.

        या प्रदर्शनामधील उत्कृष्ट प्रकल्प असलेल्या  विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची सखोल ओळखून उद्योग क्षेत्रासाठी सज्ज होण्यास मोठी मदत झाली असल्याचे प्राचार्य प्रा. व्हि. बी.धुमाळ यांनी म्हटले आहे.

     या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांची लोकनेते बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ सुधीर तांबे ,संस्थेच्या कार्यकारी विश्वस्त सौ शरयूताई देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, डॉ जे बी गुरव, प्रा व्ही बी धुमाळ प्रा जी.बी काळे यांचे सर्व विभाग प्रमुखांनी अभिनंदन केले आहे. या प्रदर्शनाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व विभाग प्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे