आपला जिल्हा

संगमनेर नगरपालिकेच्या पत्रांनंतरही सार्वजनिक बांधकाम विभाग निष्क्रिय?  अतिक्रमण हटविण्यात हलगर्जीपणा. 

संगमनेर नगरपालिकेच्या पत्रांनंतरही सार्वजनिक बांधकाम विभाग निष्क्रिय?  अतिक्रमण हटविण्यात हलगर्जीपणा. 

12 मार्चचे पत्र – अजूनही कार्यवाही नाही.

जाहिरात

Sangmner vijay kapse दि २५ मार्च २०२६- संगमनेर शहरातील नाशिक पुणे रोड व कोल्हार घोटी रोडवरील नगरपालिका हद्दीतील वाढत्या अतिक्रमणाच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी नगरपरिषदेकडून वारंवार पत्रव्यवहार करूनही संगमनेरच्या सार्वजनिक बांधकाम (PWD) विभागाकडून कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याचे निदर्शनास आले असून शहरातील नागरिकांना दररोज वाहतूक कोंडी आणि अपघाताच्या धोक्याला सामोरे जावे लागत आहे.

जाहिरात

संगमनेर नगरपालिका हद्दीतील पुणे–नाशिक राज्य महामार्ग (SH 71A) व कोल्हार–घोटी राज्यमार्ग हे अत्यंत वर्दळीचे मार्ग असून या रस्त्यांच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात दुकानदार, फेरीवाले तसेच काही ठिकाणी पक्के बांधकाम करून अतिक्रमण करण्यात आले आहे. विशेषतः 132 के.व्ही. सबस्टेशन ते पुणे रोड, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक ते प्रवरा नदी पूल तसेच तीन बत्ती चौक ते अकोले नाका या मार्गांवर परिस्थिती अधिक गंभीर होत आहे.

जाहिरात

या पार्श्वभूमीवर संगमनेर नगरपालिकेने सार्वजनिक बांधकाम विभागाला दिनांक 12 मार्च 2026 रोजी दोन सविस्तर पत्रे देऊन संबंधित रस्त्यांच्या हद्दी निश्चित करणे, बाधित मिळकतधारकांची माहिती तयार करणे, त्यांना नोटिसा बजावणे तसेच अतिक्रमण हटविण्यासाठी संयुक्त मोहीम राबविण्याची मागणी करण्यात आली होती.

जाहिरात

मात्र, प्रत्यक्षात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीत येणाऱ्या या दोन प्रमुख रस्त्यांना कोणतीही संयुक्त कारवाई झाली नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ना पाहणी करण्यात आली, ना हद्द निश्चित करण्यात आली, ना अतिक्रमणधारकांवर कोणतीही कार्यवाही करण्यात आली.

दरम्यान, नगरपरिषद प्रशासनाने पुन्हा एकदा संबंधित विभागाने तातडीने जागेवर पाहणी करून कारवाई सुरू करावी अशी मागणी केली आहे. अन्यथा शहरातील नागरिकांच्या वाढत्या रोषाला सामोरे जावे लागेल असा इशाराही  संगमनेर नगरपालिकेने सार्वजनिक बांधकाम विभागाला दिला आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे