आपला जिल्हा

अंधश्रद्धा विरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणीसाठी  अंनिस कक्ष स्थापन करावा :महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती  कोपरगाव   

अंधश्रद्धा विरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणीसाठी  अंनिस कक्ष स्थापन करावा :महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती  कोपरगाव   

अंधश्रद्धा विरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणीसाठी  अंनिस कक्ष स्थापन करावा :महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती  कोपरगाव   
जाहिरात

Kopargaon vijay kapse दि ३० मार्च २०२६-   जादूटोणाविरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार व भोंदूगिरीच्या प्रकरणावर तात्काळ कारवाई करण्यासाठी तालुकास्तरावर अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष स्थापन करावा अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कोपरगाव तालुका कार्यकारिणी ने मा तहसीलदार  महेश सावंत  यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

जाहिरात
 महापुरुष व संतांच्या विचार स्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्रात अलीकडेच उघडकिस येत असलेल्या काही भोंदू बाबांच्या प्रकरणामुळे समाजात मोठी चिंता निर्माण झाली आहे देवी शक्ती ,चमत्कार ,ज्योतिष व अध्यात्माच्या माध्यमातून अनेक ठिकाणी लोकांची आर्थिक फसवणूक, मानसिक छळ तसेच बालक व महिलांचे लैंगिक शोषण होण्याच्या घटना समोर येत आहे अशा घटनांमुळे समाजात अंधश्रद्धा वाढण्यास व गुन्हेगारी प्रवृत्तीला खतपाणी मिळण्याचा धोका निर्माण होतो या पार्श्वभूमीवर अंधश्रद्धा निर्मूलन समिती कोपरगाव यांनी तहसीलदार यांच्याकडे अंधश्रद्धा विरोधी कायदेशीर प्रभावी अंमलबजावणीसाठी अंनिस कक्ष स्थापन करावा तसेच महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध व उच्चाटन पोलीस महासंचालकांच्या दिलेल्या आदेशानुसार प्रत्येक पोलीस ठाण्यात अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष स्थापन करण्याबाबत निर्देश केलेले आहे सदर कक्ष स्थापन होऊन ते प्रत्यक्ष कार्यान्वित व्हावे याबाबत आपण मार्गदर्शक सूचना द्याव्यात या कक्षात समितीत अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सदस्यांना सामावून घ्यावे तसेच भारतीय राज्यघटनेने अधोरेखित केलेल्या वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या मूल्यांचा प्रसार करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून शाळा ,महाविद्यालय व समाज पातळीवर जनजागृती कार्यक्रम राबविण्यात यावेत 

जाहिरात
तर राज्यभर गाजत असलेल्या  शिवनिका संस्थान मिरगावचे भोंदू अशोक खरात सारखे प्रकरणे जिल्हा सह तालुका पातळीवर अस्तित्वात असण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे आपल्या मार्फत तालुका जिल्हा पोलीस प्रशासनाला अशा प्रकारच्या भोंदूगिरी चा प्रकरणांचा तात्काळ तपास करून आवश्यक त्या ठिकाणी गुन्हे नोंदवून कठोर कारवाई करण्याबाबत स्पष्ट निर्देश द्यावेत  अशा प्रवृत्तींचा निर्णायक अंत करण्यासाठी आपण सुद्धा स्वतः पुढाकार घेऊन तालुका पोलीस प्रशासनाला प्रतिबंधात्मक कारवाई करणे कामी आदेश व्हावे अशी विनंती अंधश्रद्धा निर्मूलन समिती कोपरगाव कार्यकारणी तर्फे करण्यात आले आहे.

जाहिरात
याप्रसंगी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कोपरगाव तालुका अध्यक्ष डॉ अशोक  गावित्रे, दीपक शिरसाठ, ख़िवराज  दुशिंग सेवानिवृत्त नायब तहसीलदार तसेच तालुका कार्याध्यक्ष संदीप शिंदे उपाध्यक्ष मेजर मारुती कोपरे, उपाध्यक्ष रामदास भुजाडे ,बुवाबाजी संघर्ष विभाग राजेंद्र उगले ,युवा जागृती विभाग मेजर विनोद थोरात ,विविध उपक्रम विभाग प्रवीण आभाळे ,वैज्ञानिक  जाणिवा विभाग राहुल आभाळे ,व्यसनमुक्ती प्रबोधन विभाग किशोर शिंदे आदी यावेळी उपस्थित होते

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे