आपला जिल्हा

कोल्हे गटाच्या अजून एका नगरसेवकाच्या अपात्रतेबाबत बुधवारी सुनावणी

कोल्हे गटाच्या अजून एका नगरसेवकाच्या अपात्रतेबाबत बुधवारी सुनावणी

कोल्हे गटाच्या अजून एका नगरसेवकाच्या अपात्रतेबाबत बुधवारी सुनावणी

जाहिरात

Kopargaon vijay kapse दि ३१ मार्च २०२६ :- कोल्हे गटाचे उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेविका यांच्या अपात्रतेबाबत सुनावणी झाल्यानंतर पुन्हा एकदा दुसऱ्या नगरसेवकाच्या अपात्रतेबाबत उद्या बुधवार (दि.०१) रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात होणार असून या सुनावणीकडे कोपरगावकरांचे लक्ष लागले आहे.

जाहिरात

कोपरगाव नगरपरिषदेच्या सत्ताधारी कोल्हे गटाचे उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेविका यांच्या निवडीबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून आक्षेप घेतल्यानंतर विद्यमान नगरसेवक स्वप्नील मंजुळ यांच्या निवडी बाबत देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते शिवाजी खांडेकर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे या प्रकरणी अपील केले होते. नगरसेवक स्वप्नील मंजुळ यांनी आपले निवडणूक नामनिर्देशन पत्र भरताना आपल्या अपत्यांची खोटी माहिती सादर केली असून त्यांनी आपल्या तिसऱ्या अपत्याबद्दलची माहिती जाणीवपूर्वक लपवून ठेवले असून त्यांचे नगरसेवक पद रद्द करावे याबाबत मान.जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्याकडे अपील दाखल केले होते.

जाहिरात

महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य निवडणूक अधिनियम १९९५ नुसार दोन अपत्यांपेक्षा जास्त अपत्ये असलेले व्यक्ती निवडणूक लढवण्यास किंवा पदावर राहण्यास अपात्र असते. याच कायदेशीर तरतुदीचा आधार शिवाजी खांडेकर यांनी कोल्हे गटाचे विद्यमान नगरसेवक स्वप्नील मंजुळ यांच्या विरोधात घेतला असून नगरसेवक स्वप्नील मंजुळ यांनी निवडणूक अर्जासोबत दिलेल्या प्रतिज्ञापत्रात चुकीची माहिती देऊन प्रशासनाची दिशाभूल केली आहे. त्यांनी आपल्या तिसऱ्या अपत्याची नोंद अर्जात नमूद केलेली नाही ज्याने निवडणूक नियमांचा भंग झाला असून त्यांचे नगरसेवकपद रद्द करण्यात यावे अशी मागणी केलेली आहे.

जाहिरात

मान.जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी या तक्रारीची गांभीर्याने दखल घेतली असून त्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात उद्या बुधवार (दि.०१) रोजी या प्रकरणाची सुनावणी होणार असून या सुनावणीकडे संपूर्ण कोपरगावकरांचे लक्ष लागून राहिले आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे