अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा आ. आशुतोष काळेंच्या महसूल व कृषी विभागाला सूचना
अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा आ. आशुतोष काळेंच्या महसूल व कृषी विभागाला सूचना
अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा आ. आशुतोष काळेंच्या महसूल व कृषी विभागाला सूचना

Kopargaon vijay kapse दि ३१ मार्च २०२६– कोपरगाव मतदारसंघातील काही गावांमध्ये सोमवार दि.३० रोजी विजांच्या कडकडाटासह झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि साबुदाण्याच्या आकाराच्या गारा पडल्याने गहू, कांदा आणि मका पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. काढणीला आलेल्या कांदा आणि गहू पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. झालेल्या नुकसानीची गांभीर्याने दखल घेत आमदार आशुतोष काळे यांनी तहसीलदार आणि महसूल विभागाला तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहेत.

मतदार संघातील अनेक गावांमध्ये सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसामुळे आणि गारांमुळे उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

रब्बी हंगामातील गहू, कांदा, काढणी झालेला कांदा, कलिंगड, द्राक्ष बागा या पिकांना पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. काढणीला आलेला गहू भुईसपाट झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. फळबागांचे देखील प्रचंड नुकसान झाले असून नैसर्गिक संकटामुळे शेतकरी आधीच संकटात असताना या अवकाळी पावसाने शेतीचे अर्थकारण पूर्णपणे कोलमडले आहे. अशा परिस्थितीतही महायुती शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करून एकही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये याकरिता तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश आ. आशुतोष काळे यांनी तहसीलदार महेश सावंत आणि तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे यांना दिले आहेत.




