आपला जिल्हा

एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये आता प्रख्यात कॅन्सर तज्ज्ञ डॉ. संदीप इशी यांची सेवा

एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये आता प्रख्यात कॅन्सर तज्ज्ञ डॉ. संदीप इशी यांची सेवा
एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये आता प्रख्यात कॅन्सर तज्ज्ञ डॉ. संदीप इशी यांची सेवा
जाहिरात

Vijay kapse दि ११ एप्रिल २०२६मुंबईतील प्रख्यात टाटा मेमोरियल हॉस्पिटलचा अनुभव असलेले आणि उत्तर महाराष्ट्रातील ज्येष्ठ आणि प्रख्यात मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट (कॅन्सर तज्ज्ञ) डॉ. संदीप इशी आता एसएमबीटी (SMBT) हॉस्पिटल व कॅन्सर इन्स्टिट्यूट येथे पूर्णवेळ सेवा देण्यासाठी रुजू झाले आहेत. त्यांच्या निवडीमुळे नाशिक, अहमदनगर, छ. संभाजीनगर, जालना, ठाणे, पालघरसह खान्देशातील रुग्णांना आता जागतिक दर्जाचे उपचार आपल्या जवळच उपलब्ध झाले आहेत. जास्तीत जास्त रुग्णांनी हॉस्पिटलच्या विशेष योजनांचा लाभ घेऊन तज्ञ डॉक्टरांकडून उपचार करून घ्यावेत असे आवाहन हॉस्पिटल प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

जाहिरात
डॉ. संदीप इशी यांनी मुंबईच्या टि. एन. मेडिकल कॉलेजमधून वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर बेंगळुरू येथून डी.एन.बी. आणि त्यानंतर टाटा मेमोरियल हॉस्पिटल, मुंबई येथून ‘मेडिकल ऑन्कोलॉजी’मध्ये डी.एम. ही सर्वोच्च पदवी संपादन केली आहे. कॅन्सर उपचाराचा त्यांना १४ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे., गेल्या ७ वर्षांपासून त्यांनी नाशिकमध्ये हजारो रुग्णांवर यशस्वी उपचार केले आहेत. टाटा मेमोरियल हॉस्पिटल आणि निमहन्स (NIMHANS) सारख्या प्रतिष्ठित संस्थांमध्ये त्यांनी वरिष्ठ निवासी म्हणून काम केले असल्याने जटिल प्रकरणांमध्ये त्यांनी विशेष नैपुण्य मिळवले आहे.

जाहिरात

कर्करोगाच्या उपचारात केवळ शस्त्रक्रिया महत्त्वाची नसते, तर त्यानंतर दिली जाणारी औषधोपचार पद्धती रुग्णाचे आयुष्य वाढवण्यासाठी मोलाची ठरते. डॉ. इशी हे सिस्टेमिक केमोथेरपी, इम्युनोथेरपी, केमो-रेडिओथेरपी, मॉलिक्युलर टार्गेटेड थेरपी आणि हार्मोनल थेरपी यांसारख्या प्रगत उपचार पद्धतींमध्ये तज्ज्ञ मानले जातात. विशेषतः रक्ताचा कॅन्सर (Lymphoma / Leukemia), स्तनाचा कॅन्सर आणि फुफ्फुसांच्या कर्करोगावर उपचार करण्यासाठी त्यांची ओळख आहे.

जाहिरात

एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये डॉ. इशी यांची सेवा उपलब्ध झाल्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्णांना मोठा फायदा होणार आहे. आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना योजनेअंतर्गत सर्व रेशनकार्ड धारकांसाठी येथे मोफत उपचार आणि शस्त्रक्रिया उपलब्ध आहेत. एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये डॉ. संदीप इशी यांची ओपीडी सेवा सोमवार ते शनिवार, सकाळी ९.०० ते दुपारी ४.३० या वेळेत उपलब्ध असेल. अधिक माहितीसाठी रुग्णांनी ०२५३-६९४०००० या क्रमांकावर संपर्क करावा किंवा रुग्णालयात १४ क्रमांकाच्या ओपीडीला भेट द्यावी असे आवाहन हॉस्पिटल प्रशासनाने केले आहे.

आजार अंगावर काढू नका
कर्करोगाचे लवकर निदान झाल्यास तो पूर्णपणे बरा होऊ शकतो. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य मार्गदर्शनाच्या जोरावर आम्ही ग्रामीण भागातील शेवटच्या रुग्णापर्यंत पोहोचण्याचे ध्येय ठेवले आहे. कर्करोगाशी निगडीत बहुतांश शस्रक्रिया या  आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेत मोफत होत आहेत. त्यामुळे रुग्णांनी आजार अंगावर न काढता रुग्णालयात भेट द्यावी किंवा जवळच्या एसएमबीटी क्लिनिकमध्ये संपर्क साधावा.
डॉ. संदीप इशीमेडिकल ऑन्कोलॉजिस्ट (कॅन्सर तज्ज्ञ)एसएमबीटी हॉस्पिटललवकरच पेट स्कॅन व रेडीएशन थेरपीएसएमबीटीत मेडिकल ऑन्कोलॉजीस्ट डॉ. संदीप इशी, सर्जिकल ऑन्कोलॉजीस्ट डॉ. अंबरीश चॅटर्जी व  डॉ. विनायक शेनगे, बालरोग कॅन्सरतज्ञ डॉ. पिंकी शाह–काळे, तर हेमॅटो ऑन्कोलॉजीस्ट (ब्लड कॅन्सर) डॉ. गिरीश बदरखे सेवा देत आहेत. गेल्या वर्षभरात १५ पेक्षा अधिक बोन मॅरो ट्रान्सप्लांट आणि कार-टी सेल थेरपी याठिकाणी झाल्या. याठिकाणी स्वतंत्र केमोथेरपी वार्ड उपलब्ध आहे. लवकरच अत्याधुनिक पेट स्कॅन आणि रेडिएशन थेरपी सुरू होणार आहे. यापुढे एसएमबीटी हॉस्पिटल हे सर्वसमावेशक कॅन्सर केअर सेंटर म्हणून काम करेल.सचिन बोरसे, संचालक, आरोग्यसेवा, एसएमबीटी सेवाभावी ट्रस्टएसएमबीटीत कॅन्सर निदानापूर्वीच्या तपासण्या मोफत


कर्करोग निदानापूर्वीच्या तपासण्यांसाठी  एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये अर्थसाहाय्य केले जात आहे त्यामुळे रुग्णांसाठी हा मोठा दिलासा आहे. ही सुविधा सोमवार ते शनिवार दरम्यान उपलब्ध असून रक्त तपासण्या, बायोप्सी, सीटी स्कॅन, एमआरआय आदी महत्त्वाच्या तपासण्या यामध्ये समाविष्ट आहेत. टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या मार्गदर्शनाखाली तज्ज्ञ डॉक्टरांची टीम येथे कार्यरत असून बोन मॅरो ट्रान्सप्लांट व CAR-T सेल थेरपीसारखे आधुनिक उपचारही उपलब्ध आहेत. लक्षणे दिसताच विलंब न करता तपासणी केल्यास कर्करोगाचे लवकर निदान होऊन उपचार करण्यास पुरेसा वेळ मिळतो.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे